बजरंग बली की असा जल्लोष झाला की आपोहून आपल्या मुखातून जय हा शब्द बाहेर पडतो. जे भक्त निस्वार्थी मनाने हनुमानजींची पूजा करतात त्यांना हनुमान जी कधीच काही कमी पडू देत नाहीत. आजवर तुम्ही बजरंग बलीच्या अनेक मंदिरांना भेट दिली असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत जिथे हनुमानजीना दाढी मिशा मध्ये पुजले जाते.
सालासर ह्या राजस्थान मधील राज्यात हे मंदिर स्थित आहे. सालासर बालाजी ह्या नावाने ही ठिकाण ओळखलं जातं. भारतातील सर्वच राज्यातून इथे भक्तगण दर्शनासाठी येत असतात. इथे राहण्यासाठी भक्तांना धर्मशाळा तयार केली आहे. ह्या जागेचा इतिहास काय आहे आपण जाणून घेऊया.
मोहनदास नावाचे एक हनुमान जी ह्यांचे भक्त ह्या क्षेत्रात राहत होते. ह्या भक्ताला हनुमानजी ह्यांनी स्वप्नात दाढी मिशा असलेल्या रुपात दर्शन दिले. काही दिवसांनी एक जाट शेतकऱ्याच्या शेतात काही आढळले, त्याने खोदून पाहिले तर तिथून दगडाची मूर्त सापडली. मूर्ती साफ केल्यानंतर हनुमानजीचे रूप त्या मूर्तीत आढलून आले. शेतकऱ्याची पत्नीने जेवणात त्याला चूरमा सुद्धा दिला होता. म्हणून त्या शेतकऱ्याने चूरमाचे नैवैद्य त्या मूर्तीला दाखवले. तेव्हापासून ह्या मूर्तीला चूरमाचे नैवैद्य देण्याची परंपरा पडली.
त्याच रात्री आसोटा येथील एका ठाकूरच्या स्वप्नात हनुमान जी येऊन ती मूर्ती सालासर इथे न्यायला सांगितली. जेव्हा हनुमान जी मोहनदास ह्याच्या स्वप्नात आले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की जेव्हा ही मूर्ती सालासर पोहोचेल तेव्हा बैलगाडी कुणीही चालवू नका. जिथे ही बैलगाडी थांबेल तिथेच ह्या मुर्तीची स्थापना होईल. आजही तुम्ही तिथे गेलात तर मोहनदास ह्यांची धुणा प्रज्वलित आहे. इथेच बजरंग बलीसोबत आई अंजनी आणि मोहनदास ह्यांची सुद्धा मंदिरे आहेत. इथे ज्या मंदिराचे बांधकाम केले आहे ह्यात मुस्लिम कामगाराचा खूप मोठा हात होता.
प्रत्येक दिवस इथे खूप गर्दी असते पण शरद पौर्णिमेला इथे लक्खी यात्रा भरते. ह्या भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून तिचा उल्लेख आहे.