Home हेल्थ कंटाळा येतो का तुम्हालाही सकाळी लवकर उठण्याचा? मग लावा स्वतःला ही सवय

कंटाळा येतो का तुम्हालाही सकाळी लवकर उठण्याचा? मग लावा स्वतःला ही सवय

by Patiljee
2556 views

आता सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा हा आपल्यातील बहुतेक लोकांना येतोच. कारण झोप मोडते आणि मग झोप अर्धवट झाल्यावर पुढचा संपूर्ण दिवस आळशी आणि कोमेजलेला जातो. म्हणून खर तर तुम्ही आम्ही सगळ्यांनीच रोज लवकर उठायची गरज असते. त्यासाठी स्वतःला काही नियम लावून घ्या म्हणजे लवकरच तुम्ही लवकर उठण्याचा नियम तुमच्या शरीराला लावून घेऊ शकता. त्यासाठी काय कराल तर ते आज आपण पाहूया.

मित्रानो नवीन वर्षाला काही लोक आपल्या मनाशी नियम ठरवतात. मग ते एक, दोन तीन असे कितीही नियम असले तरी काही लोकांना आपली झोप पूर्ण होत नाही. म्हणून असे नियम अर्ध्यावर सोडूनही देतात. तर काही लोक आपल्या मुद्द्यावर ठामपणे उभे राहतात आणि आपल्या शरीराला चांगली आणि योग्य सवय लावून घेण्यासाठी लवकर उठतात. अशी लोक आपल्याही आजूबाजूला असतात पण आपणही त्यातलेच एक असतो. त्यामुळे सांगायचे कोणाला हा करून गप्प बसतो. कोणतीही गोष्ट सुरू करताना मनाची तयारी, तीव्र इच्छाशक्ती महत्वाची असते. त्यानंतर त्यामध्ये सातत्य राखणे ही खरी तारेवरची कसरत.

तुम्हाला जर सकाळी लवकर उठायची इच्छा होत नसेल तर याला कारणीभुत तुम्ही रात्री रोज उशिरा झोपता त्यामुळे सकाळी उठायची इच्छा होत नाही. यासाठी तुम्ही रोज लवकर झोपत जा. आता तुम्ही म्हणाल लवकर झोपच येत नाही. तर यासाठी काय कराल थोडी शतपावली करा किंवा एखादा आवडीचे पुस्तक वाचा किंवा कोमट दूध प्या, जायफळ हा ही झोप येण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आज नाहीतर उद्या लवकर झोपण्याची सवय तुम्हाला लागेल. आता लवकर झोपलात तर आपण लवकर उठू शकता.

यासाठी पहिल्याच दिवशी जर का हा प्रयत्न असफल ठरला तर मात्र हताश होऊ नका. प्रत्येक सवय लागायला थोडा वेळ लागतो. जश्या वाईट सवयी लवकर जडतात तश्या चागल्या सवयी आत्मसात करायला वेळ तर लागणारच ना? त्यासाठी पुढे तुमचे प्रयत्न चालूच ठेवा तुम्हाला नक्की जमेल लवकर उठायला. आता तुम्ही बोलाल लवकर उठून नक्की काय करायचे तर बाहेर जाऊन चाला तसेच व्यायाम करा. नाहीतर योगा करा हे सगळच आपल शरीर निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल