शिर्डी वाले साई बाबा की जय असे म्हणत लाखो भाविक बाबांच्या दर्शनासाठी जात असतात. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून भक्तगण शिर्डीमध्ये येत असतात. बाबांच्या अनेक असे चमत्कार आहेत जे आपण आपल्या पूर्वजानकडून किंवा पुस्तकातून वाचलेच आहेत. आज आम्ही तुम्हाला अशीच एक वाचनात आलेली बाबांची कथा सांगणार आहोत.
मुंबई मधील एका व्यापाराचा मुलगा आजारी होता. तो एवढा आजारी होता की त्याच्या आजाराचे कारण आणि निदान दोन्ही सापडत नव्हते. अखेर त्या मुलाला बाबांकडे त्या व्यापाऱ्याने मोठ्या आशेने घेऊन गेले. शिर्डीमध्ये पोहोचताच त्यांनी साईना प्रणाम करून त्यांचे पाय धरले. आपल्या मुलांसोबत घडत आलेला प्रकार त्यांनी साईना समजावला.
साईनी चेहऱ्यावर एक गोड हसू आणत त्या मुलाला आशीर्वाद दिला. जशी सायंकाळ होत गेली तसतसे त्या मुलाच्या तब्बेतीत फरक जाणवू लागला. हे पाहून तो व्यापारी खुश होऊन साईकडे गेला. बाबांनमुळे माझा मुलगा बरा झाला म्हणून तो ओरडू लागला. पण साईनी त्याला थांबवत म्हटलं फक्त आणि फक्त परमात्मा कुणाला जीवन देऊ शकतात, ह्यात माझे काहीच सामर्थ्य नाहीये.
काही दिवस व्यापारी आणि त्याचा मुलगा शिर्डीत राहिले तोपर्यंत त्या मुलाच्या तब्बेतीत खूप फरक आला होता. आता तो पूर्णतः ठीक होत होता. परत आपल्या घरी निघण्यासाठी जेव्हा हे कुटुंब निघाले तेव्हा परत एकदा बाबांची भेट घ्यावी म्हणून ते बाबांकडे गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन घरी जाण्याची परवानगी मागितली.
साईनी त्या व्यापाऱ्याला तीन रुपये देत म्हणाले, दोन रुपये मी आधीच तुला दिले आहेत, आता हे तीन रुपये घे ह्यांना पूजा स्थळी ठेव, देवाचे नामस्मरण कर, नेहमीच चांगले कर्म कर, तुझे भले होईल. त्या व्यापाऱ्याने तीन रुपये घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. ह्या प्रवासात तो एकच विचार करत होता की बाबांनी मला आधी दोन रुपये कधी दिले? मी तर पहिल्यांदाच त्यांना भेटलो मग ते मला दोन रुपये आधी कसे देऊ शकतात?
ह्याच चिंतेत असताना तो घरी पोहोचला. घडलेला सर्व प्रकार त्याने आपल्या वृद्ध आईला सांगितला. तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले, की बाळा जेव्हा तू लहान होतास आणि आजारी होतास तेव्हा तुझे बाबा तुला साई कडे घेऊन गेले होते. तेव्हा साईनी तुझ्या डोक्यावर मायेने हात फिरवत तुला दोन रुपये दिले होते. ते फक्त एक सिध्दपुरुषच नाहीत तर आपल्या भक्तांच्या मनाला जोडले आहेत. म्हणुनच त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते.
आईचे हे उत्तर ऐकून तो व्यापारी खूप जास्त आनंदीत झाला. तेव्हा त्याला पूर्ण विश्वास बसला की भक्त आणि देवाच नातं खूप मजबूत असतं. जरी भक्त माया मध्ये हव्यासापोटी देवाला विसरला तरी देव मात्र त्यांना कधीच विसरत नाहीत, ते नेहमीच कठीण परिस्थिती आली की आपल्या पाठी खंबीरपणे उभे राहतात.
लेखक : पाटीलजी
ही कथा वाचनात आली म्हणून तुमच्यासोबत शेअर करतोय. कथेमागचा पूर्ण इतिहास जरी आम्हाला माहीत नसला तरी साई आणि भक्ताचे नाते नेहमीच गोड राहिले आहे हे ह्या कथेमार्फत सुद्धा दिसून येत.
तुम्हाला अशाच प्रकारच्या हॉरर कथा वाचायच्या असतील तर आमच्या ह्या नवीन साईटला आवर्जून भेट द्या.