Home बातमी ३० वर्षापासून होते इंग्रजी विषयाचे शिक्षक, पण आता करावी लागत आहे मजुरी

३० वर्षापासून होते इंग्रजी विषयाचे शिक्षक, पण आता करावी लागत आहे मजुरी

by Patiljee
891 views

सध्या करोना व्हायरसने संपूर्ण जगात आपला जम बसवला आहे. जगातून तो लवकर हद्दपार होईल असे तरी चिन्ह सध्या दिसत नाहीयेत. पण त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. लॉक डाऊन भारतात सुरू केल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशीच एक बातमी केरळ मधून समोर आली आहे. तेथील एक इंग्रजी विषयाचे शिक्षक आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे पालनपोषण करण्यासाठी लॉक डाऊन मध्ये मजुरी करत आहे.

त्यांचे नाव मिथल बाबू आहे. ते ५५ वर्षाचे आहेत. मागील ३० वर्षापासून ते ओंचीयान ह्या भागात मुलांना इंग्रजी भाषेचे धडे देत होते. पण लॉक डाऊन मुळे सर्व शाळांना सुद्धा सुट्टी दिल्याने त्यांच्या शाळेने सुट्टी जाहीर केली, त्यांचा पगार सुद्धा थांबवला आहे. म्हणूनच एका कन्स्ट्रक्शन साइटवर ते मजुरी करून आपला घरखर्च भागवत आहेत. त्यांच्याशी बोलल्यानंतर ते म्हणाले “मला माहित नाही हा लॉक डाऊन कधी संपेल आणि पुन्हा कॉलेज शाळा सुरू होतील, पण माझ्या कुटुंबातील व्यक्तींची जबाबदारी तर माझ्यावर आहे मग मला काहीतरी काम करून घरी पैसे आणावे लागतील”.

सध्या त्यांना मजुरी करून ७५० रुपये दिवसाला मिळतं आहेत. आणि ह्यात सुद्धा ते खुश आहेत. त्यांचे म्हणणे आहे की काम खूप असतं पण करायला सुद्धा आनंद मिळतो कारण घरी बसण्यापेक्षा काहीतरी कमावून घरी आणतोय ह्याचा आनंद त्यांना जास्त आहे.

त्यांनी आपल्या घरासाठी कर्ज सुद्धा काढले आहे. त्यांचा मोठा मुलगा सिव्हिल इंजिनिरिंग तर छोटा ११ मध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा त्यांना करायचा आहे. त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना पैसे रुपात मदत केली होती. पण त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यांच्यामते ते अजून स्वतः आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकतात.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल