मित्रानो रूईचे झाड हे गावा ठिकाणी आपल्याला नक्कीच आढलुन येतं. डोंगराळ भागात किंवा रस्त्याच्या आजूबाजूला झाडगलीत ही झाडे आढळतात. आता रुईच्या झाड म्हटल्यावर आपल्याला त्याचा एकच उपयोग आठवतो तो म्हणजे हळदीच्या दिवशी नवरा आणि नवरीला या झाडाच्या फुलाच्या मुंडावळ्या बनवून घालतात. तर रुईच्या झाडाचे धार्मिक महत्त्व म्हणजे शनिवारी या झाडाच्या पांनाची माळ ही मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला घालतात.
झाड तसे विषारी आहे म्हणतात पण ते फक्त आपल्या डोळ्यांसाठी या झाडाचे चिक आपल्या डोळ्यांसाठी घातक असते. पण तरीही या रुईच्या झाडाचे अनेक फायदे खरंच आपल्या शरीराला मिळतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ते आपण आज जाणून घेऊयात. या झाडाची पानं ही मधुमेह सारख्या रोगावर अत्यंत उपयोगी आहेत. या झाडाची पाने ठेचून घ्या आणि ती पायाला बांधा वरून पायमोजा घालून ठेवा यामुळे साखर नियंत्रणात राहते.
तुमच्या केसात कोंडा झाला असेल तर यावरही हे झाड उपयोगी आहे. या झाडाचे चिक काढून ये केसांना लावा, यामुळे तुमचा कोंडा नक्की दूर होईल. पण नंतर हात स्वच्छ पाण्याने साफ धुऊन घ्या.
रुईची फुलं सुकवून त्याचे चूर्ण तयार करा आणि हे चूर्ण तुम्हाला जात अस्थमा झाला असेल तर रोज खा.
तुमच्या शरीरावर जखम झाली असेल आणि ती लवकर बरी होत नसेल तर अशा वेळेस या झाडाचे चिक त्या जखमेवर लावावे जखम लवकर भरून येईल.
तुमचे दात दुखत असतील तरी यावर या झाडाचे चिक उपयुक्त आहे यासाठी या चिका मध्ये थोडे सैंधव मीठ मिसळून हे मिश्रण त्या ठिकाणी लाऊन ठेवावे.
रुईची पाने सूकवा आणि ती जाळून त्याचा धूर मूळव्याध झालेल्या जागी द्या त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास कमी होईल.
कावीळ झाली आसेल तर पानासोबत रूईच्या पानाचा तुकडा खावा असे केल्यानंतर हा रोग बरा होतो. शरिरावर झालेली एखादी जखम बरी होत नसेल तर रूईच दुधाबारोबर दारूहरिद्रा मिसळून हे मिश्रण जखमेवर लावा. असे केल्याने जखम लवकर बरी होते.
गजकर्ण झालेल्या ठिकाणी या झाडाचा चीका मध्ये थोडे खोबरेल तेल मिसळा आणि हे त्या जागेवर लावा तुम्हाला काही दिवसात फरक जाणवेल.