तर मित्रहो रितेश देशमुख याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता एका वेगळ्या मार्गाने जाऊन आपली स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. त्याचे वय आता 41 इतके झाले आहे पण अजूनही चित्रपटात काम करण्याची धमक त्याचात आहे. त्याचा पहिला सिनेमा 16 वर्षांपूर्वी “तुझे मेरी कसम” आला होता. या सिनेमा द्वारेच त्याने बॉलिवुड मध्ये पदार्पण केले. ह्या सिनेमात जेनेलिया डिसूझा हिनेसुद्धा बॉलीवुड मध्ये पदार्पण केलं. याशिवाय रितेशने असे अनेक सिनेमे त्याने केले ज्यामधे आपल्या कॉमेडी ने लोकांना हसवले आहे. मस्ती, क्या कूल है हम, मालामाल विकली, हे बेबी आणि हाऊसफुल हे चित्रपट प्रामुख्याने आहेत.
तर रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची पहिली भेट ही त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. पहिल्यांदा तर तिने रितेश देशमुख याला भाव दिला नाही कारण तिला असे वाटले ही हा मुख्यमंत्र्यांचां मुलगा आहे आणि याला खूप जास्त घमेंड असेल वगेरे म्हणून पण मुळात तसे काहीच नव्हते हे जेनेलिया हिला माहीत नव्हते. पण रितेश जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा त्याने पहिल्यांदा जेनेलिया सोबत हात मिळवला पण त्यानंतर ही जेनेलिया हिने त्याला इग्नोर केले होते.
पण त्यानंतर चित्रपटाची शुट्टिंग चालू झाली आणि सगळं वातावरण बदलून गेलं होतं जेनेलिया रितेश बद्दल जे काही अगोदरपासून मनात शंका धरून होती तो आता हळू हळू खोटी ठरत चालली होती कारण रितेश हा स्वभावाने खूप चांगला आहे हे तिला या चित्रपटाच्या शूटिंमध्ये कळाले आणि त्यानंतर या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली होती.
रितेश आणि जेनेलियाला एकमेकांच्या मैत्रीची इतकी सवय झाली होती की ते प्रेमात कधी पडले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. पहिल्या चित्रपटापासूनच सुरु झालेले त्यांच्यातील नाते त्यांनी बाहेर कळू दिले नाही. त्यांच्या मते त्यांच्यातील नात्याचे सौंदर्य हेच होते की त्यांना एकमेकांच्या प्रेमात गुंतण्यासाठी कधीही महागड्या भेटवस्तू किंवा कॅण्डल लाईट डिनरची आवश्यकता पडली नाही. अखेरीस दहा वर्षांच्या मैत्रीनंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांचे लग्न झाले. २०१४ मध्ये त्यांना रियान नावाचा मुलगा झाला तर रितेशला २०१६ मध्ये दुसरा मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी राहील ठेवलं.

मित्रानो अशी लव स्टोरी प्रत्येकाचीच असते पण वेगवेगळी असते तुम्हालाही झाले असेल ना असे प्रेम कोणासोबत?