Home करमणूक रितेश देशमुख याने आतापर्यंतच्या आयुष्यात किती प्रॉपर्टी एकवटली आहे पहा

रितेश देशमुख याने आतापर्यंतच्या आयुष्यात किती प्रॉपर्टी एकवटली आहे पहा

by Patiljee
488 views

रितेश देशमुख जरी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असला तरी त्याने आपली वाटचाल ही वेगळ्या परीने चालायचं असे ठरवून आतापर्यंत त्याने बॉलिवुड मधील अनेक सिनेमे केले त्यांच्यातील त्याच्या भूमिकांना तोड नाही, त्याने जसे हिंदी चित्रपट केले तसे मराठी ही केले. रितेश याने आपल्या चित्रपट सृष्टीमधील पाऊल हे “तुझे मेरी कसम” ह्या चित्रपटाने केली. यात त्याची धर्मपत्नी जेनेलिया ही सुद्धा होती.

त्यानंतर या अभिनेत्याने मागे पहिलेच नाही आता हा अभिनेता ऍक्शन चित्रपटांपेक्षा कॉमेडी अभिनेता म्हणून जास्त ओळखला जातो. 2003 या साली रितेशने चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला होता. लोकांनी या अभिनेत्याला प्रेम ही खूप दिले पण या अभिनेता कडे किती संपत्ती आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. काही जणांचे आता असे म्हणणे असेल की आम्हाला काय करायचे आहे त्याची संपती जाणून. पण ह्या माणसाने स्वतः च्या हिमतीवर हा डौलारा उभा केला आहे, हे विसरता कामा नये.

रितेश देशमुख हा अभिनेता एक चित्रपटामध्ये काम करण्याचे जवळ 5 ते 6 कोटी रुपये इतके मानधन घेतो. याशिवाय त्याने आर्किटेक्चरल आणि इंटेरिअर डिझाइनिंगमध्येही गुंतवणूक केली आहे. सध्या सिनेमात जरी रितेशचं बस्तान बसलं असलं तरी ‘इवॉल्यूशन्स’ ही आर्किटेक्चरल अँड इंटीरिअर डिझायनिंग कंपनीही चालवतो. याशिवाय त्याची स्वतःची प्रोडक्शन कंपनीही आहे, ‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाची रितेशची स्वत:ची निर्मिती संस्था आहे.

याअंतर्गत त्याने ‘लय भारी’, ‘माऊली’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. शिवाय त्याला आलिशान गाड्या चालवण्याची ही खूप आवड आहे. शिवाय बहुतेक गाड्या या महाग आहेत, त्याच्याजवळ आता एक कार आहे तिची किंमत 2.5 कोटी इतकी आहे. रितेशच्या सर्व गाडयांना एक या आकडयाची खास नंबर प्लेट आहे. शिवाय त्यांच्या बंगल्यांची किंमत ही जवळ जवळ 70 कोटी रुपये इतकी आहे. तसेच त्यांची संपूर्ण संपत्ती ही 144 कोटी रुपये इतकी आहे. (हा फक्त इंटरनेट माध्यमातून समोर आलेला आकडा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त संपत्ती सुद्धा असू शकते)

रितेश आपली पत्नी जेनेलिया आणि दोन मुलांसह आपल्या संसारात अगदीच आनंदी आहे. रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट झाली त्यावेळी जेनेलिया ला वाटले रेतेश त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन राजकारणात म्हणून ती त्याच्यापासून थोडी लांबच राहायची पण रितेश कसा आहे हे जेव्हा तिला खात्रीपूर्वक कळले तेव्हा त्यांच्या प्रेमाची बीजे रोवली गेली.

लवकरच रितेशचा बाघी ३ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेमात रितेश सोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. ह्या सिनेमात त्याने पोलिसाची भूमिका साकारली आहे. ह्या सिनेमासाठी सुद्धा भलेमोठे मानधन रितेश देशमुखला मिळालं आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल