सलमान खानच्या रेडी सिनेमात दिसलेला हा हास्य कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. मोहित बघेल असे ह्या अभिनेत्याचे नाव असून त्याचे वय अवघे २७ होते. त्याला कॅन्सर होता आणि गेले अनेक वर्ष त्यासोबत तो लढा देत होता. पण आज ह्या लढाई मध्ये मोहित वर कॅन्सर ने मात केली आहे.
आपल्या अभिनयाने नेहमीच सर्वांना हसवणारा आज मात्र सर्वांना रडवून गेला. रिऍलिटी शो मधून लोकांना हसवून त्याने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते. सलमान खान, परेश रावल, असीन अशा दिग्गज कलाकारा सोबत त्याने स्क्रीन शेअर केली होती. आपल्या अभिनयाने त्याने ह्या सिनेमात लोकांना खळखळून हसवले. ह्या सिनेमात त्याने छोटे अमर सिंह चे पात्र साकारले होते.
७ जून १९९३ मध्ये त्याचा जन्म उत्तर प्रदेश मध्ये झाला होता. नोएडा मध्ये बऱ्याच महिन्यापासून त्याच्यावर उपचार चालू होते पण आज नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि तो हे जग सोडून निघून गेला. बॉलीवूड मध्ये त्याच्या जाण्याने शोकांतिका पसरली आहे.
सध्या लॉक डाऊन मुळे त्याच्या अंत विधीसाठी कुणाला जाता येणार नाही ह्याची खंत अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे.