मृत्यू कधी येऊ शकेल हे आपण कुणीही सांगू शकत नाही. तो कुणालाच चुकलेला नाही. अशीच काहीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्राझील मधील प्रसिद्ध गायत्री मरीलिया मेडॉन्साचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ही बातमी समोर येताच सर्वांना धक्का बसला आहे.गायिका मारीलिया ब्राझील पुरती मर्यादित नव्हती तर तिच्या आवाजाचे चाहते संपूर्ण जगभर होते.
या अपघातात मारीलिया सोबत तिचा मॅनेजर आणि सोबत एक असिस्टंट होता. दुर्दैवाने या तिघांचाही मृत्यू झाला आहे. मृत्यूची बातमी समजताच ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सोशल मीडियावर पोस्ट करून दुःख व्यक्त केलं आहे. तर देशभरातील सेलिब्रिटी या घटनेवर शोक व्यक्त करत आहेत. अचानक आलेल्या या बातमीने संपूर्ण जगभरातील सिने सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मरीलिया मेडॉन्साचे इंस्टाग्रामवर चाळीस मिलियन चाहते आहेत तर ती सर्टनेजोची आयकॉन म्हणून संपूर्ण जगात विख्यात होती. ब्राझील मधील लॅटिन ग्रॅमी म्हणून प्रसिद्ध असलेला मानाचा पुरस्कार तिला २०१९ मध्ये मिळाला होता. पण या एका घटनेने सर्वच होत्याच नव्हतं होऊन बसलं.
ती एका गाण्यासाठी करोडो रुपये घेत असतं. याचमुळे ती नेहमी चर्चेचा विषय होती. आपल्या अलिशान राहणीमानामुळे जगभर विख्यात होती. तिचा स्वतचं असा प्रायव्हेट जेट होता. याच मध्ये बसून ती नेहमी फिरायची. पण याच जेट मध्ये ती अखेरचा श्वास घेईल हे कुणालाच माहीत नव्हतं. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.