Home बातमी चित्रपट सृष्टिवर शोककळा या प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या…!!

चित्रपट सृष्टिवर शोककळा या प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या…!!

by Patiljee
1689 views

जयश्री रामय्याया प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. जयश्री मागील काही वर्षांपासून डिप्रेशन माधे होती असे सांगितले जाते. जयश्री वर बॅगलोर मधील संध्याकिरण आश्रम मध्ये उपचार सुरू होते. बऱ्याच दिवसापासून ती डिप्रेशन ची शिकार झाली होती.

या आधी ती कन्नड बिग बॉस मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आपल्या कारकिर्दीत तिने भरपूर चाहता वर्ग देखील कमावला होता मात्र सुशांत सिंग प्रमाणेच आपल्या कामासाठी आयुष्य संपवणारी आणखी एक अभिनय क्षेत्रातील घटना जयश्रीच्या आत्महत्येने समोर आली आहे. 24 जून 2020 रोजी जयश्रीच्या फेसबुक हँडल वर तिने आपण नैराश्यातून आत्महत्या करणार असल्याचे म्हंटल होतं.

त्यात एक कानडी सुपरस्टार ने तिला काम मिळवून देण्याचं देखील आश्वासन दिलं होतं. यानंतर तिचा हा पब्लिसिटी स्टंट असावा असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र तसे नव्हते. तिने हे सर्व खरे भासवत आपल्या राहत्या घरीच आपली जीवनयात्रा संपवली. या बातमीने चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. मागील काही दिवसांत करिअर माधे येणारे चढ उतार पाहता तिला ते सांभाळणे शक्य होत नसल्याचं देखील ती अनेकदा म्हणाली होती.

नेमक्या याच कारणाने ती अनेक दिवस डिप्रेशन मध्ये राहत होती. ज्या ठिकाणी तिच्यावर मनोसोपचार तज्ज्ञांच्या कडून उपचार सुरू होते तिथेच तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपली. तिने टाकलेल्या पोस्ट मध्ये आपल्याला जगण्याची इच्छा नाही असे लिहिले होते मात्र काही वेळा नंतर तिने ती पोस्ट डीलीत केली. अस्वासने मिळूनही पदरी निराशाच पडते आशा काहीशा विचाराने तिने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले असावे.

जयश्री एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आणि उत्तम डान्सर देखील होती. आपल्या पहिल्या चित्रपटातून तिने पदार्पणातच खूपच उत्तम छाप चाहत्यांवर सोडली होती. कन्नड बिगबॉस मुळे ति आणखी प्रसिद्धीच्या झोतात आली. Uppu Huli Khara या आपल्या पहिल्या कन्नड चित्रपटातून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. याविषयी जयश्री च्या मित्र परिवाराशी विचारणा केली असता, जयश्री कोणत्यातरी कौटुंबिक वादातून मानसीक दृष्ट्या खचली होती असे सांगितले जाते.

लोकांनी आपल्याशी संपर्क ठेऊ नये म्हणून ती वारंवार आपला नंबर बदलत असे. मधल्या काळात तिने सर्वांशीच संपर्क तोडला होता. कुणीही जवळचे व्यक्त होण्यासाठी नसल्याने तिने हे टोकाचे पाउल उचलले असल्याचे सांगण्यात येते. बराच काळ कोणाशी संपर्क नसल्याने त्या संशयातून तिच्या रूम मध्ये चेक केले असता तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.मागे एक शो मध्ये तिने सांगितले होते की ती आर्थिक रित्या सक्षम आहे मात्र कामामुळे ती काही प्रमाणात डिप्रेशन आहे.

यामुळे मानसिक खच्चीकरण होत आहे याचं करणांतून तिने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असावा. माझ्याशी कोणीही कुठलाही संपर्क ठेऊ नये अशी देखील तिने सर्वांना विनंती केली होती. मात्र त्या वेळी तिचे विधान फारसे काही विशेष वाटले नव्हते. मात्र तिच्या या टोकाच्या पावलाने चाहत्यांना मोठा धक्काच दिला आहे. जयश्रीच्या जाण्याने चित्रपट श्रुष्टीवर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल