रिमी सेन बॉलिवुडमध्ये गाजलेली ही अभिनेत्री तिने अनेक सिनेमे आपल्या नावे केले आहेत. कितीतरी हिट सिनेमे दिल्यानंतर ती आता अचानक कुठे गेली हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हंगामा, बागबान आणि धूम या चित्रपटात तिचे काम पाहण्यासारखे होते. रिमी सेन हिचे खर नाव सुशोमित्रा असे आहे. तिने जेव्हा सिनेसृष्टीत नव्याने पदार्पण केले त्यावेळेस तिने आपले नाव बदलून रिमी सेन असे ठेवले होते.

बॉलिवुड मध्ये तिचा पाहिला चित्रपट हंगाम यातून तिने एन्ट्री केली आणि हा सिनेमा त्यावेळी हिट झाला होता. त्यानंतर तो प्रेक्षकांच्या मनात उतरली आणि तिने यापुढे जाऊ बागबान, धूम, गरम मसाला, दीवाने हुए पागल, फिर हेरा फेरी, गोलमाल हे सिनेमे केले हे चित्रपट ही लोकांना खूप आवडले होते. गोलमाल हा सिनेमा जबरदस्त हिट झाला होता पण या चित्रपट नंतरच या सुंदर अभिनेत्रीचे करीयर संपुष्टात आले. कारण तिचे वादग्रस्त वक्तव्य यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य पणाला लागले. गोलमाल या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी तिने सांगितले की या चित्रपटात मी एकटीच अभिनेत्री आणि माझ्यासोबत चार अभिनेत आहेत.
रोहित शेट्टी डायरेक्टर एक चांगला डायरेक्टर आहे त्याला वाटले तर तो एखाद्या साऊथ आफ्रिकन मुलीला ही पडद्यावर सुंदर दाखवेल, असे तिचे बोलणे होते. ह्या घटनेवर राइट ग्रुप्स आणि अफ्रीकी देशातील लोक भडकले. कित्तेक महिला संघटना यांचे मोर्चे निघाले. या सगळ्या कारणांमुळे फिल्म निर्माण तिला सिनेमात घ्यायला घाबरत असतं आणि यामुळे खरतर तीच करीयर संपुष्टात आले. बुधिया सिंग हा सिनेमा सुद्धा तिने प्रोडूस केला होता. शेवटी ती 2015 मध्ये बिग बॉस 9 या टीव्ही शो मधे दिसली होती पण इथे सुद्धा हवं तसे यश तिला पदरात पाडता आले नाही.
सध्या रिमी ह्या झगमगत्या दुनियेपासून लांब राहून आपले वयक्तिक आयुष्य जगत आहे.