रेखा हिने तिच्या काळात खूप सारे सुपरहिट सिनेमे दिले आणि त्यातील गाणी सुद्धा इतकी गाजली की आजही आपल्या मुखात बऱ्याचदा रुळत असतात. पण त्यावेळची आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे. तेव्हा सिनेमे होते आणि त्यामुळे रेखा हीची लाईफ स्टाईल मेनटेन होत होती पण आताच्या काळात तिच्याजवळ कोणतेच काम नाही आणि तरीही तीची जीवन पद्धती इतकी हाय फाय कशी आहे? असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल ना मग चला आपण आज या प्रश्नाचं उत्तर बघुया.

तर बघा रेखाची सेविग, आणि प्रॉपर्टी ही जवळ जवळ 25 अरब इतकी आहे या शिवाय रेखा हिने आपली मुंबई आणि दक्षिण भारतातील असणारी काही प्रॉपर्टी ही रेंट वर दिली आहे. शिवाय ती एका आलिशान आणि किमती बंगल्यामध्ये राहते आहे जो बँड स्टँड एरिया मध्ये आहे.
एका इंटरव्ह्यू मध्ये रेखा ने सांगितले आहे की मी पैसा खर्च करताना विचार करून करते ते अगोदर सेविंग केलेले पैसे ते त्या काळापासून सेवींग केलेले आहे. शिवाय त्याचा व्याज ही लाखो रुपयांमध्ये मिळतो आहे यावर ही बोलताना ती म्हणते की व्याजाचे पैसे आल्यावर ही मी ते विचार करूनच खर्च करते. इतकं सगळं असून सुध्दा रेखा काही वस्तूंची ब्रँड एंबैस्डर आहे शिवाय कितीतरी वेळा काही इव्हेंट असतात त्याच्या शुभारंभ करण्यासाठी आणि स्टोअर ओपनिंग साठी सुद्धा जाते आणि यामुळे ही तिला भरपूर पैसे मिळतात.