तुम्ही शिळी चपाती नेहमीच खात नसाल कधीतरी खाणे तुम्हाला आवडते पण सारखे खाणे तुम्हाला अजिबात आवडणार नाही. शिवाय शिळे अन्न खाणे म्हणजे पोटाला याचा बाधिकार त्यामुळे तुम्ही सहसा शिळे अन्न खाणे टाळता पण आपल्या रोजच्या आहारात असणारी ही चपाती शिळी खल्ल्याने मिळतात तुमच्या शरीराला अनेक फायदे. पण ती चपाती फक्त 12 ते 16 तास अगोदर खायला हवी त्यानंतर मात्र ती खाणे टाळावे. शिळी चपाती कधी कधी तुम्ही फेकून देता किंवा पाळीव प्राण्यांना खायला घालता पण हीच चपाती खाल्याने अनेक फायदे मिळतात हे वाचून थक्क व्हाल.
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर यासाठी शिळी चपाती खाणे हे अत्यंत उपयोगी आहे यासाठी काय कराल तर ही पोळी सकाळी दुधात 10 मिनिटे भिजत ठेवा आणि याचा नाष्टा सकाळी करा यामुळे तिचे उच्च रक्तदान नियंत्रणात राहते.
दुधात भिजवलेली चपाती खाल्याने आपल्या शरीराचे वाढलेले तापमान नियंत्रणात येते त्यामुळे शरीर थंड रहाते.
जय लोकांनां मधुमेह आहे अशा लोकांनी नियमित शिळी चपाती खाणे हे त्यांच्या साठी लाभदायक आहे त्यासाठी दुधात 10 मिनिट चपाती भिजवून ठेवा आणि नंतर ती खा यामुळे तुमचा मधुमेह आटोक्यात राहतो.
शिळ्या चपाती मध्ये प्रोटीन आणि ऊर्जा हे दोन्ही स्रोत चांगल्या प्रमाणत असतात त्यामुळे तुम्ही जर रोज व्यायाम किंवा जिम् करत असाल तर ही चपाती खाल्ल्याने तुमचे शरीर लवकर थकत नाही.
गव्हाच्या चपाती मध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शिळी चपाती खाल्याने पचनक्रिया सुधारते आणि रात्री झोपण्याआधी दुधात भिजवलेली शिळी पोळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

आपल्या वाचकांपैकी कुणा कुणाला अशी शिळी चपाती खायला आवडते. आम्हाला नक्की सांगा.