रती अग्निहोत्री हे नाव म्हटलं की आपल्याला एक दुजे के लिये मधील सपना आठवते. आपल्या अभिनयाने असंख्य भारतीयांच्या मनात आपले घट्ट स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून रती ह्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबईमध्ये पंजाबी कुटुंबात झाला. त्यांच्या घरात पहिल्यापासून अभिनयाची रुची असल्याने त्यांनी सुद्धा ह्याच क्षेत्रात येण्याचे ठरवले होते. अखेर त्यांनी पुथीया वारपुंगल (१९७९) मध्ये सिने सृष्टीत पदार्पण केले. बॉलीवुडमध्ये त्यांनी जिने की आरजु (१९८१) मध्ये पदार्पण केले. त्यांनी ह्यानंतर अनेक सिनेमात सुद्धा कामे केली.
१९८१ ह्या वर्षात त्यांनी बॉलीवुड मध्ये सत्यम शिवम, एक दुजे के लिये, दो दिल दिवाणे, साहस ह्या चित्रपटात कामे केली. आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. एक दुजे के लिये ह्या सिनेमाने तर सर्व विक्रम मोडीत काढत ब्लॉक बस्टर सिनेमा काय असतो हे बॉलीवूड इंडस्ट्रीला दाखवून दिलं. ह्यानंतर त्यांचे लग्न अनिल विरवानी सोबत ९ फेब्रुवारी १९८५ मध्ये झाले. पण २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रती अगनिहोत्री सध्या आपल्याला काही सिनेमात दिसून येतात पण तुम्हाला हे माहित आहे का की त्यांचा मुलगा सुद्धा सिनेसृष्टीत काम करत आहे. त्याने सुद्धा अनेक सिनेमे, वेब सिरीज केल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या ह्या मुलाबद्दल.
त्यांच्या मुलाचे नाव तनुज विरवाणी आहे. तो सुद्धा एक गुणी अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने आपले बॉलीवुड पदार्पण लव यू सोनियो ह्या हिंदी सिनेमातून २०१३ रोजी केले होते. हा सिनेमा जोय राजन ह्यांनी दिग्दर्शित केला होता. २०१४ मध्ये पुरानी जीन्स ह्या सिनेमात सुद्धा तो मुख्य भूमिकेत दिसला होता. २०१६ मध्ये सुद्धा सनी लियोन सोबत त्याला वन नाईट स्टँड ह्या सिनेमात स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. त्याला अभिनेता म्हणून त्यांनी आपली ओळख ह्या सिनेमातून मिळवता आली नव्हती.

पण २०१७ मध्ये आलेल्या अमेझॉन प्राईमच्या इनसाईड एज ह्या वेब सिरीज ने त्याला अभिनेता म्हणून ओळख दिली. त्याने ह्या सिरीज मध्ये साकारलेले वायू राघवन हे पात्र लोकांना खूप जास्त भुरळ पाडून गेलं. ह्यानंतर त्याने वुट सिरीज मध्ये सुद्धा काम केले. झी फाईव वर पॉईझन आणि कोड एम अशा वेब सीरिजमध्ये सुद्धा मुख्य भूमिका केल्या आहेत. काहीच दिवसापूर्वी इनसाईड एज दुसऱ्या पर्वाला सुद्धा लोकांनी डोक्यावर धरले आहे. एका गुणी अभिनेत्रीचा मुलगा सुद्धा तिच्याच पावलावर पाऊल ठेवत पुढे जात आहे. हे बघून खरंच आनंद होतो.
मित्रानो तुमच्यापैकी कुणाला रती अग्निहोत्री ह्यांच्या मुलाबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून सांगा.