रंभा ही अभिनेत्री शरीराने तशी मजबूत आणि दिसायला खूप सुंदर अशी ही अभिनेत्री तुम्ही तिला सलमान सोबत काही चित्रपट मध्ये पाहिली असेल. बंधन’ आणि ‘जुड़वा’ या चित्रपट मध्ये ती आपल्याला दिसली होती. पण त्यानंतर जास्त काही तिला आपल्याला पाहायला मिळाले नाही. कारण ती लग्न करून आपल्या तीन मुलांसह कॅनडा या देशात राहत आहे.
रंभा हिने जसे बॉलिवुड मध्ये काम केले आहे त्याच प्रमाणे तिने मल्याळम चित्रपट ही कामे केली आहेत. शेवटी शेवटी ती 2011 मध्ये ‘फिल्मस्टार’ या मल्याळम चित्रपट मध्ये पाहायला मिळाली होती. रंभा ने 1995 मध्ये ‘जल्लाद’ या चित्रपटाने बॉलिवुड मध्ये पदार्पण केले होते. तिने बॉलिवुड मध्ये एकूण 17 चित्रपट मध्ये काम केले आहे तर मल्याळम मध्ये जवळ जवळ 100 चित्रपट मध्ये तिने काम केले आहे. सलमान सोबत झालेला चित्रपट जुडवा यातून ती प्रेक्षकांना खूप आवडली होती आणि हिट ही झाली होती.
तिने बॉलिवुड मध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले आहे त्यात सलमान खान, रजनीकांत, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगन आणि मिथुन चक्रवर्ती ह्यांचा समावेश आहे. तिने काही शो मध्ये जज म्हणून काम ही केलेले आहे.
तिने 2010 का एका व्यावसायिक म्हणजेच इंद्राण पद्मनाथन याच्यासोबत लग्न केले आहे. सध्या ही अभिनेत्री कॅनडा मध्ये राहत आहे. लग्न होऊन तिला आता दोन मुली आहेत. पहिली लान्या आणि छोटी साशा. एक मुलगा ही आहे त्याचे नाव आहे शिविन आहे. मुलाचा जन्म झाला त्यावेळी तीच वय 40 वर्ष होते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपल्या फॅमिलीचे फोटो ही ती इथे शेअर करत असते. 2018 ला जेव्हा सलमान एका शो साठी कॅनडाला गेला होता तेव्हा तिथे तिने आपल्या फॅमिली सोबत त्याची भेट घेतली होती.