Home करमणूक हिंदी मध्ये नवऱ्याने तर मराठी बिग बॉसमध्ये बॉयफ्रेंड ने केलं आहे राखी सावंतला प्रपोज

हिंदी मध्ये नवऱ्याने तर मराठी बिग बॉसमध्ये बॉयफ्रेंड ने केलं आहे राखी सावंतला प्रपोज

by Patiljee
227 views
Rakhi sawant

बिग बॉस मराठीचा आता लवकरच शेवट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच बिग बॉस मराठी लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. त्यामुळे काही मोजकेच स्पर्धक या शो मध्ये राहिले आहेत. आता त्यातील कोणता स्पर्धक बाजी मारतो ते शेवटच्या आठवड्यात कळेल पण या आठवड्यात स्पर्धकांचे नातेवाईक म्हणजे घरातील सदस्य त्यांना भेटायला येतात तेव्हा सर्व स्पर्धक इमोशनल होतात आणि हाच भाग पाहायला लोकांना जास्त आवडतो. लोक याच भागाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात.

सध्या याच भागाची सुरुवात झाली आहे. एकएक करून प्रत्येक सदस्याचे कुटुंबीय घरात येत आहेत. ८० दिवसानंतर आपल्या घरातील व्यक्तींना भेटून सगळेच भाऊक झाले.

या सर्व स्पर्धक मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री झालेली स्पर्धक म्हणजे राखी सावंत Rakhi Sawant, हिच्या येण्याने बिग बॉस मध्ये जास्त करून रंजकता आली. तिने जशी हिंदी बिग बॉस मध्ये टीआरपी वाढवली तशीच मराठी बिग बॉस मध्येही वाढवली आहे. बिग बॉसचे अनेक पर्व गाजवलेली ही एकमेव अभिनेत्री असली तरीही फॅमिली विक मध्ये कधीही कोणी तिच्या घरातील सदस्य भेटायला आले नाही कारण तिची आई नेहमी आजारी असते.

पण यावेळी तिच्या जवळची व्यक्ती तिला मराठी बिग बॉस मध्ये भेटायला आली आहे. ती म्हणजे तिचा प्रियकर. त्याच नाव आहे आदिल खान दुर्राणी. त्याने येताना तिच्यासाठी एक खास गिफ्ट ही आणले आहे ते म्हणजे राखीची सर्वात प्रिय कॉफी आणि महत्वाचं म्हणजे आदिल ने राखीला मराठी मध्ये प्रपोज केले, त्याची घरात एंट्री होताच राखी भाऊक झाली.

तो एक एक करून सर्वच सदस्यांना भेटला शिवाय किरण राखी सोबत फ्लर्ट करतो म्हणून त्याने किरण माने यांची मस्करी केली. राखी आणि आदिलची आपल्याला क्यूट केमिस्ट्री ही पाहायला मिळाली.

हेच हिंदी बिग बॉस मध्ये मागच्या वर्षी ती आपल्या नवऱ्यासोबत दिसली होती. सर्व जगासमोर तिने त्याला आपलं मानलं होतं आणि लग्न केल्याची कबुली दिली होती पण घराबाहेर पडताच या दोघांचा घटस्फोट झाला.

फॅमिली विक चा हा आठवडा तुम्हाला कसा वाटला आणि यातील कोणाच्या घरातील सदस्य तुम्हाला जास्त आवडले ते ही कमेंट करून सांगा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल