रजनीकांत चे जास्तीत जास्त सिनेमे हे साऊथ मध्ये आहेत पण तरीही हा हिरो फक्त साऊथ मधेच नाही तर संपूर्ण भारत देशात आणि इतर देशांतही तेवढाच प्रसिद्ध आहेत. पण साऊथ मधले लोकांनी रजनीकांत यांना खूप जास्त प्रेम दिले आहे घेतले कारण रजनीकांत ची ख्याती आहेच तशी यांना देव मानणाऱ्या लोकांचीही कमी नाही आहे जेव्हा त्याचा सिनेमा टॉकीज वर येणार असतो तेव्हा पहाटे 3 वाजल्यापासून त्या टॉकीज च्या बाहेर लाईन लावलेली लोक दिसून येतात. तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की रजनीकांत ला सिनेमा चे मानधन मिळते ते आशिया मधील सर्वात जास्त आहे म्हणजे जॅकी चन नंतर रजनीकांतचा दुसरा नंबर लागतो.
रजनीकांतच्या सिनेमा ची कमाई ही करोडो मध्ये होते. रजनीकांत जरी तमिळ सिनेमात आपले सिनेमे करत असले तरी त्याचा मुळ हा मराठी आहे त्यांचा जन्म हा बंगलोर मध्ये 1950 ला झाला होता. आणि त्यांचा नाव शिवाजीराव गायकवाड हे आहे. लहान असल्यापासून अंगात अक्टिंग चा किडा या कलाकाराच्या अंगी होता शाळेत असताना खूप साऱ्या अभिनयाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
त्याचबरोबर स्वतच्या परिवाराची काळजी होतीच यासाठी त्यांनी बस कंडक्टर तसेच कूली चे काम ही केले. या कामाच्या ठिकाणी रजनीकांत आपल्या अंगातील कलाकाराला लपऊ शकला नव्हता हाताने चस्मा फिरवणे इत्यादी कला त्याला अवगत होत्या यांदर्म्यान त्यांची भेट एक फिल्म मेकर सोबत झाली. याच दरम्यान त्यांना 1975 ला निगेटिव्ह रोल मिळाला. त्यानंतर हळू हळू त्यांना अभिनयाचा रोल मिळत गेला आणि पुढे जाऊन तो साऊथ चा सुपरहिट अभिनेता झाला. त्यानंतर रजनीकांत चां एक बॉलिवुड सिनेमा आला अंधा काणून त्याचे नाव होते त्यामध्ये अमिताभ आणि हेमा मालिनी होती रिना रॉय असे कलाकार होते तर यामध्ये रजनीकांत ची भूमिका एका इन्स्पेक्टर ची होती.
त्यानंतर त्यांनी बॉलिवुड मध्येही भरपूर सिनेमे केले पण ज्या प्रकारची लोकप्रियता त्यांना साऊथ मध्ये मिळत होती तितकी बॉलिवुड मध्ये मिळाली नाही. वर्षातून दोन तरी सिनेमे येत राहतात शिवाय यावेळी आलेली 2.0 हा सिनेमा ही खूप हिट झाला होता. पण आता राजनिकांच्या फॅन ना त्याच्या पुढच्या सिनेमाची आतुरता लागून राहिली आहे. रजनीकांत ने लता रंगाचारी हिच्यासोबत लग्न केले आणि त्यांना दोन मुलीही आहेत त्यांचे नाव आहे ऐश्वर्या आणि सौदर्य. दोघींनी आपल्या संसारात सुखी आहेत ऐश्वर्या फिल्म मेकिंग करते आहे.
हे पण वाचा अशोक सराफ यांचा मुलगा मुळात कोण आहे आणि काय व्यवसाय करतो