प्रत्येकाच्या गळ्यातली ताईत बनलेला तुझ्यात जीव रंगला मालिका अनेक वर्ष आपले मनोरंजन करत होती. ह्यातील प्रत्येक पात्र जणू आपल्या घरातले सदस्य झाले होते. ह्यातिलच एक पात्र म्हणजे सन्नी दा. ज्या प्रमाणे राणा लोकांना आवडला होता. त्याचप्रमाणे त्यांचे थोरले बंधू सुद्धा लोकांना खूप जास्त आवडले होते. सन्नी दा ची भूमिका राज हंचनाळे केली होती. आज आम्ही तुम्हाला राजच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.
राजला तर तुम्ही सर्वच ओळखत असणार ह्यात काही शंका नाही पण खूप कमी लोकांना माहिती आहे की राज विवाहबंनात कधीच अडकला आहे. त्याने २०१९ मध्ये हरियाणातील मॉली डेस्वाल सोबत लग्न केलं आहे. दोघेही एकमेकांना सहा वर्षांपासून डेट करत होते. अखेर मागच्या वर्षी ११ डिसेंबर २०१९ ला त्यांनी आपल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात केलं. राज कोल्हापूर तर मॉली हरियाणाची रहिवाशी आहे.
मॉली डेस्वाल ही सारेगामा प्लॅटफॉर्म मध्ये एनिमेटर आहे. ती खूप छान स्केचिंग करते तर त्याहून अधिक छान तिचे मन योगा मध्ये अडकते. आपल्या सोशल नेटवर्कर ह्या संदर्भातल्या पोस्ट ती नेहमीच करत असते. गुढी पाडव्याच्या दिवशी राजने दोघांचाही फोटो पोस्ट केला होता. तो सध्या खूप व्हायरल झाला आहे.

खूप कमी लोकांना माहीत होत की सन्नी दाच लग्न झाले आहे. तुम्ही पण त्यातलेच होता का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.