Home हेल्थ जेव्हा तुम्हाला खूप राग येतो, या रागातून ही तुम्ही आनंदी कसे राहू शकता हे पाहूया

जेव्हा तुम्हाला खूप राग येतो, या रागातून ही तुम्ही आनंदी कसे राहू शकता हे पाहूया

by Patiljee
643 views

तुमचा संपूर्ण दिवस आनंदात गेला असेल आणि दिवस सरता सरता जर कोणी येऊन तुम्हाला एखादी वाईट गोष्ट बोलला असेल ज्यामुळे तुम्हाला खूप राग येतो. या रागामुळे तुमचा रात्र आणि पुढचा दिवस ही तसा काही बरा जात नाही. आणि म्हणुच एक गोष्ट लक्षात घ्या ती बोलणारा व्यक्ती बोलून जातो, त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपण फक्त आपले द्धैय कडे वाटचाल करायला हवी. बोलणार व्यक्ती बोलून जातो मग त्रास आपण आपल्या शरीराला का करून घायचा.

तस बघायला गेलो तर या जगात कोण चुकत नाही ही गोष्ट होऊच शकत नाही. कारण चुका तर सगळ्यांच्या हातून होत असतात त्यामुळे आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करा, असा हेतू नाही तर यातून तुम्ही पुढे जाऊन काही तरी शिका. या जगात सर्वच चुका करत असतात लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत चुका ह्या सर्वांकडून होत असतात. आणि सर्वांवर टीका ही केली जाते मग ती व्यक्ती कोणतीही वाईट गोष्ट करो किंवा चांगली गोष्ट करो.

प्रसिद्ध असणारे कलाकार यांच्यावर तर हद्दी पेक्षा जास्त टीका केली जाते. पण तरीही ते या दुनियेत ताठ मानेने उभे असतात कारण ते या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे आपण ही दुर्लक्ष करायला हवे, समोरची व्यक्ती मूर्ख आहे असे समजून लक्ष देऊ नका. त्यांनी कितीही काही तुमच्यावर टीका किंवा आरोप केले तर त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. पूर्णपणे दुर्लक्ष करा. हे केल्याने तुमच्या मनावर आलेले दडपण दूर होईल.

आपण त्याच्या गोष्टीवर कोणतीच रिअँक्शन् देत नाही याचा त्याला राग येईल आणि तो तुमच्यापुढे हार मानेल. जो व्यक्ती तुमच्यावर नेहमी वाईट गोष्टींचा भडिमार करत असतो, त्याच्याकडे एका जोकर सारखे पाहा जो नेहमी जोक सांगतो आणि लोकांना हसवत असतो. आपण ही तसेच करायचे जोक ऐकले असे स्वतच्या मनात म्हणायचे आणि दुर्लक्ष करायचे.

जगात अश्या व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही सुखी झालेले मुळीच आवडत नाही आणि त्यामुळे त्यांना तुम्हाला आनंदात ही पाहता येत नाही यासाठी ते तुम्हाला कोणत्याही गोष्टीवरून असे बोलतात की तुम्हाला त्याचा राग येतो पण तरीही या रागावर कसे नियंत्रण ठेवायचे ते ही आपल्यावर आहे. कारण जेव्हा समोरच्याला वाटते आपण दुखी असलो की त्याला आनंद होईल ह्यावेळेस सूत्र आपल्या हातात असतात. तुम्ही काहीही झाले तरी चेहऱ्यावर आनंद ठेवा मग समोरचा व्यक्ती तुम्हाला आनंदी पाहून जळत राहील.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल