क्रिकेट जगतातील तरुण खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा पृथ्वी शॉ सध्या क्रिकेट पासून लांब आहे. तुमच्या माहितीकरिता बीसीसीआयने त्याला जून मध्ये डोपिंग टेस्ट मध्ये फेल झाल्यामुळे त्याच्यावर खेळण्याची बंदी घातली होती. ही बंदी १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आहे. ह्या काळात शॉ सोशल मीडिया पासून सुद्धा लांब होता. बऱ्याच दिवसापासून त्याची कोणतीही बातमी समोर येत नव्हती. तो काय करतोय, क्रिकेट सराव करतोय की कुठ बाहेर देशात फिरण्यास गेला आहे असे नेटकरी तर्क वितर्क लावत होते.
काहीच दिवसापूर्वी पृथ्वी शॉ चे फोटो एका क्रिकेट मॅच दरम्यान समोर आले आहेत. हे फोटो पाहून सर्व क्रिकेट चाहते अचंबित होत आहेत. कारणही अगदी तसेच आहे म्हणा कारण ह्या काही महिन्यात शॉ ची तब्बेत खूप जास्त पटीने वाढली आहे. कर्नाटक आणि छत्तीसगढ़ ह्यांच्यात झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सेमीफायनल मध्ये त्याचे हे रूप जगासमोर आले.

क्रिकेट पासून लांब असलेला पृथ्वी शॉ त्याच्या तब्बेतीवरून दिसत आहेत की त्याने आपल्या फिटनेस कडे हवं तेवढं लाख दिलं नाहीये. जिथे विराट कोहली रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, के एल राहुल आणि इतर भारतीय खेळाडू आपण जास्तीच जास्त कसे फिट राहू ह्याकडे लक्ष देत आहोत तर शॉ मात्र आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीये असे दिसत आहे. पण येणाऱ्या काळात कदाचित चित्र वेगळं असू शकत कारण त्याच्यावर लागू असलेली बंदी उठेल त्या आधी तो स्वतः ला नक्कीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.