प्रीती झिंटा ही बॉलिवूड मधील उत्कृष्ट अभिनय करणारी अभिनेत्री, हिने आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आणि म्हणून आज ती या जगात आपले पाय खंबीर पने रोवून उभी आहे. तिने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात आपले राज्य निर्माण केले आहे, प्रीती झिंटा दिसायला खूप सुंदर आणि तिच्या गालावर पडणारी खळी त्याहूनही अधिक मन मोहून टाकणारी आहे. गोरी गोमटी अशी ही अभिनेत्री अगदी लहान असल्यापासून स्वतच्या पायावर उभी आहे हे ऐकुन तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे.
लहान असताना म्हणजे वयाच्या 13 वय वर्षी तिचे वडील एका कार दुर्घटनेमुळे गेल्यामुळे लहान असताना वडिलांचे डोक्यावरून छत्र हरपले. शिवाय याच अपघातात प्रीती हिच्या आईला ही गंभीर दुखापत झाली आणि त्यात जवळ जवळ 2 वर्षे अंथरुणाला खिळून होती. तिला दोन भाऊ ही आहेत. विचार करा अशा परिस्थितीत आपल्या ही मनाची दैनिय अवस्था झालीच असती ना तशीच प्रीतीची ही झाली पण ती हरली नाही. तिची लिरील साबणाची जाहिरात तुम्हाला आठवत असेलच शिवाय 1997 ती आपल्या एका मित्रासोबत ऑडिशन साठी गेली होती.
पण निर्माता यांनी तिचेही ऑडिशन घेतले आणि तिला अभिनय करण्यासाठी प्रोस्ताहित केले. त्यानंतर तिला मनी रत्नम यांची “दिल से” हा चित्रपट मिळाला. त्यानंतर तिने सोल्जर , क्या केहणा, संघर्ष, दिलं चाहता है, चोरी चोरी चुपके चूपके, मिशन कश्मिर, अरमान, रास्ते प्यार के, सलाम नमस्ते, कभी अलविदा ना कहना आणि दिलं है तुम्हारा असे अनेक चित्रपट केले.
स्वतच्या पायावर उभे राहिल्यावर तिने वयाच्या 41 व्या वर्षी लग्नाचा निर्णय घेतला आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणाऱ्या अमेरिकन सिटिजन जीन गुडइनफ याच्यावसोबत 2016 ला लग्न केले ती दोघे जेव्हा अमेरिका ट्रीपला गेले होते तेव्हा दोघांची ओळख झाली होती.