तुला कसे कळतं नाही पवन आपले लग्न नाही होऊ शकत, आपल्या वयाच्या मध्ये ८ वर्षाचा फरक आहे. तुला हे चांगलेच माहीत आहे तरीसुद्धा तू का लग्नासाठी पाठी लागला आहेस माझ्या? हे बघ जिया मी तुला आधीच सांगितले आहे आणि आताही सांगतोय. मी जेव्हा तुझ्यावर प्रेम केलं तेव्हा तुझे वय पाहून तर केलं नव्हतं ना प्रेम? मग आता कशाला ही वयाची अडचण काढतेस? मलाही काहीच प्रोब्लेम नाहीये, तर तू का एवढी विचार करतेस?
हे बघ पवन मला तू हवा आहेस, पण तुझे वय अजुन लहान आहे रे, आपण जेव्हा लग्न करू तेव्हा लोक तुला बोलतील की किती मोठी बायको आहे तुझी? मित्रही तुला नेहमी चिडवतील, एक दिवस तुलाही मग वाटेल की तुझा निर्णय चुकीचा होता आणि जसजसे आपले वय वाढेल तसतसे तू तरुण दिसशील आणि मी म्हातारी दिसायला लागेल. मग तुला अजुन तुझ्या निर्णयाचा पच्छाताप होईल. म्हणून आताच हे सर्व थांबवले तर बरं आहे.
जिया किती विचार करतेस तू हे? हा विचार तर मी सुद्धा नाही केला. कल किसने देखा हैं? मला तू आवडतेस, तुझा स्वभाव आवडतो म्हणून मी तुझ्या प्रेमात आहे. तुझा चेहरा बघून आणि वय पाहून नाही प्रेम केलं मी तुझ्यावर. जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा तो संपूर्ण आठवडा तू माझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये होतीस, माझी काळजी घेत होतीस. अग एवढच काय तर मला थोड बर नाही वाटले तर हजार वेळा फोन करून हे खा, हे खाऊ नकोस असे सल्ले देत असतेस.
अग तुझ्या एवढी काळजी करणारे,माझ्यावर प्रेम करणारे मला कुणी भेटूच शकत नाही. राहिला प्रश्न तुझा वयाचा तर ते कधी ना कधी वाढणार ते थोडीच थांबून राहणार आहे. तुझे वाढेल माझेही वाढेल. चेहरा आज सुंदर दिसतोय वयोमानाप्रमाने चेहऱ्यात बदल होणार की पण तुझ्या मनात कधी बदल होणार आहे का? तू जेवढं आज माझ्यावर प्रेम करतेस तेवढेच प्रेम वयाच्या वृद्घकाळात सुद्धा करशील मला माहित आहे. आणि म्हणूनच मला माझी धर्मपत्नी म्हणून तूच हवीस.
तूं ना पवन खरंच खूप वेडा आहेस रे, तुझ्या ह्याच स्वभावाच्या तर मी प्रेमात आहे. रडवलेस बघ मला. अरे माझी जीयू रडली. ये इकडे मिठीत ये पाहू. आणि हो एक लक्षात ठेव आपली भांडणे झाली लग्नानंतर किंवा तुला मला काही सांगायचे असल्यास तू मोठ्या तोऱ्यात सांगू शकते स की मी मोठी आहे तुझ्यापेक्षा मग माझे ऐकायलाच हवं तू (दोघंही जोर जोरात हसू लागतात)
कसे आहे ना मित्रानो वय हे फक्त अंतर आहे, जर तुम्ही मनापासून कुणावर प्रेम करत आहात ना तर त्याला कधीच सोडून जाऊ नका. मग जात, वय, भूतकाळ अशा कोणत्याच गोष्टी मध्ये आल्या तरीही. जर तुम्ही ह्या कारणांनी तुमच्या जोडीदाराला सोडून जाता तर तुमचं प्रेम कधीच खरं नव्हत.
भयकथा वाचा रात्रीचं डबल सीट
लेखक : पाटीलजी