Home कथा प्रेमाचा संशयकल्लोळ

प्रेमाचा संशयकल्लोळ

by Patiljee
5311 views
संशयकल्लोळ

तुला सांगितले ना मला नाही लग्न करायचे तुझ्याशी मग का सारखा वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करतोस तू? राधा ने रागातच अमोलला म्हटलं. दिवभरातून त्याचा हा तेतीसावा कॉल होता. रोज वेगवेगळ्या नंबर वरून ५० ६० कॉल ठरलेले असतात. त्यामुळे राधा खूप महिने अस्वस्थ होती. त्यांचं चार वर्षाचे प्रेम प्रकरण त्यामुळे सहाजिकच एवढ्या लवकर अमोलला विसरणे कठीण होत. पण त्याचे हे वेड्यागत वागणं, तिला त्रास देणे ह्याला ती फार कंटाळली होती.

त्यांचं ब्रेकअप होऊन आज एक वर्ष पालटून गेलं असेल पण असा एकही दिवस नाही आला जेव्हा अमोलने तिला कॉल केला नसेल. कॉलेजपासून सर्व व्यवस्थित होत. जेव्हा राधा कॉलेजला होती तेव्हा अमोल दीड वर्ष तिच्या मागे होता पण राधा ने त्याला भाव दिला नव्हता. पण जसेजसे दिवस बदलत गेले त्या दोघांनी एकमेकांना लग्नाची वचने सुद्धा दिली. खूप प्रेम करत होते दोघे एकमेकांवर. जणू काही ह्या पृथ्वी तलावर ते दोघेच जीव आहे आणि जगत आहेत अशीच त्यांची समज होती.

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत असंख्य कॉल, मेसेज, व्हिडिओ कॉल असायचे. वेळ मिळेल तेव्हा फिरायला जाणे, सिनेमा पाहणे हे चालूच होते. राधाला चांगले चांगले कपडे आणि तिच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी तो आता तिला देउ लागला होता. तिने बऱ्याचदा नकार दिला कारण तिला एवढ्या महाग वस्तूची सवय नव्हती पण अमोल ने कधी प्रेमाने तर कधी रागाने नेहमीच तिला मोठमोठ्या वस्तू दिल्या आहेत. पाच मिनिट जरी राधाला ऑनलाईन यायला उशीर केला तरी अमोलच्या हृदयाची धडधड वाढायची. खूप प्रेम दोघांचेही एकमेकावर. दोघांच्याही घरात एव्हाना सर्व कळलं होतं. त्यामुळे तो प्रश्न मुळात नव्हताच. पण हे एवढे जिव्हाळ्याचे प्रेम अमोल कडून संशयात निर्माण झाले. राधा भेटायला आली की जरी पाच मिनिटे उशीर झाला तरी त्याची चिडचिड व्हायला सुरुवात झाली.

तिच्या बाबतीत तू खूप जास्त पझेसीव होत चालला होता. चाट करत असताना रिप्लाय द्यायला थोडा तरी उशीर झाला तरी चीड चीड करायचं. कुणाशी बोलतेस?, एवढे लेट रिप्लाय का करतेस?, रिड मेसेज करून सुद्धा रिप्लाय का नाही देत?, असे अनेक प्रश्नाची प्रश्नावली राधा समोर ठेवायचं. त्याच्या ह्या बदलत्या स्वभावाला आता राधा सुद्धा कंटाळली होती. त्याचे म्हणणे फक्त आता एवढेच राहिले होते मी फक्त आणि फक्त माझ्याशीच बोलायचे बस बाकी कुणाशीच बोलायचे नाही. ना तुझ्या मित्रांशी ना मैत्रिणीशी ना कुटुंबातील इतर व्यक्तीशी.

ते दोघं नात्यात तर होते पण अगोदर जो विश्वास एकमेकांवर होता तो विश्वास आता नाहीस होऊ लागला होता. अमोलने इतर मुलीशी बोलले तरी चालते आणि राधा ने जर बोलले मात्र त्याला चालत नव्हते. तरीसुद्धा राधा त्याचे हे सर्व ऐकत होती कारण मनोमनी तिने त्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार मानला होता. त्यामुळे त्याचे वागणे ती मुकाटपणे सहन करत होती. अनेक वेळा त्याने तिला गरज असताना पैस्यांची मदत सुद्धा केली होती. आणि तिने सुद्धा बऱ्याचवेळा अमोलला वेळेला पैसे दिलेच होते.

पण हद्द मात्र तेव्हा झाली जेव्हा एक दिवशी भांडणात अमोल ने तिच्यावर आजवर केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला आणि मी जेवढे पैसे तुझ्यावर आजवर खर्च केले आहेत ते माझे मला परत कर असे सांगितले. आता मात्र राधाच्या रागाचा बांध फुटला होता. आजवर अनेकवेळा तिने त्याला समजून घेतलं होत. बऱ्याचदा त्याने ब्रेकअप केले होते तेव्हा राधा स्वतः जाऊन समजून काढायची. पण ह्यावेळेस त्याने लिमिट क्रॉस केली होती.

तुझ्या कोणत्याही कुटुंबातील माणसाकडे जायचं नाही, जॉबला जायचं नाही, मित्रांशी बोलायचं नाही, मोबाईल मध्ये फक्त आणि फक्त माझ्याशीच बोलायचे अशा अनेक अटी त्याने तिच्या समोर ठेवल्या होत्या. आता राधाला आपण आयुष्यात केलेल्या सर्वात मोठी घोडचूक लक्षात आली होती. नात्यात असताना सुद्धा अनेक चांगल्या चांगल्या मुलांनी तिला लग्नासाठी विचारलं होतं? पण तिचे मनापासून अमोलवर प्रेम होत म्हणून ती सर्वांना नकार देत होती. पण ह्यावेळी मात्र अमोलने जे केलं होत त्यामुळे तिने स्वतः त्यासोबत ब्रेकअप केलं आणि वेगळी झाली.

ह्या गोष्टीला दीड वर्ष पालटून गेलं आहे पण आजही अमोल तिच्या पाठी आहे. तो अजुनही तिला विसरू शकला नाहीये. रोज दारू पिने, गावात टवाळक्या करणे हेच चालू असते त्याचे. मस्त दिवसभर घरात बसून लाईफ जगत आहे. आजही त्याला असे वाटतं नाही की त्याने जॉबला जावे. तो रोज राधाला फोन करून हेच सांगतो लग्न कर माझ्याशी पण राधा चे सुद्धा म्हणणं आहे की आधी स्वतः च्या पायावर उभा राहा मग मी विचार करेल पण सहा महिने गेले तरी तो अजुनही कोणता व्यवसाय किंवा जॉब करत नाहीये. तू जर माझी नाही झालीस तर मी तुला कुणाची होऊ देणार नाही असे त्याचे स्पष्ट मत आहे. जर तू माझ्याशी लग्न नाही केलेस तर मी तुला खूप काही करू शकतो अशा धमकीही तो देत आहे.

त्यामुळे राधा खूप जास्त डिप्रेशन मध्ये चालली आहे. जगासमोर हसतमुख राहणारी राधा आतून किती खचली आहे ही फक्त ती स्वतः समजू शकते. कारण तिला माहीत आहे अमोल सोबत तिने लग्न केले तर तिचे स्वातंत्र्य पार हिरावून जाईल. घराच्या चार भिंतीतच तिला आपले संपूर्ण आयुष्य काढावे लागेल. पण त्याच्या आणि तिच्या घरचे तिला लग्नासाठी फोर्स करत आहेत. पण अमोल कसा आहे ही तिला चांगलं माहीत आहे मग अशातच स्वतः आगीत उडी कशी मारणार?

मित्रानो तुम्हाला काय वाटतं राधा ने काय निर्णय घ्यावा? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये द्या. कदाचित तिला पुढच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला सोपे होईल.

मी लिहलेल्या ह्या कथा पण वाचा

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल