Home कथा प्रेमाची अबोल सुरुवात भाग दोन

प्रेमाची अबोल सुरुवात भाग दोन

by Patiljee
4955 views

दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या फोनची रिंग वाजली नंबर पाहिला तर अनोळखी होता पण मनात विचार आला कदाचित त्याचा तर हा नंबर नसेल ना? पण मी बोलू काय त्याच्याशी आणि पहिल्यांदा बोलायची खूप भीती वाटत होती. फोन उचलू की नको आणि विचार करता करता फोन ची रिंग वाजणे बंद झाले. वाटलं का नाही उचलला मी फोन स्वतलाच दोष देत बसले. पुन्हा कॉल करायची इच्छा होती पण हिम्मत मात्र होत नव्हती, तेवढ्यात समोरच्या घरातील मीना आली. मीना म्हणजे माझी लहानपणा पासूनची मैत्रीण तिच्यासोबत गप्पा मारायला मला खूप आवडायचे.

दोघीही मनातल्या सगळ्या गोष्टी एकमेकींना सांगत होतो आणि लग्नातली घडलेली गोष्ट ही मी तीला सांगितली पण तिचे ह्या प्रकरणावर मत खूप वेगळे होते, मलाच कळत नव्हते तिचे जे मत चांगले होते की वाईट ती म्हणत होती ‘ अग वेड्यासारखी शहरी मुलाच्या प्रेमात पडू नकोस आपण खेड्यातील मुली त्यामुळे आपल्याला फसवायला ते मागे पुढे पाहत नाहीत. पण तरीही मला त्याच्याबद्दल वाटणारे आकर्षण अजिबात किंचितही कमी झाले नव्हते. आता दुपार झाली होती आणि घड्याळात दोन वाजले होते इतक्यात पुन्हा माझ्या फोनची रिंग वाजली आणि हो त्याचाच फोन होता. मी एका वेगळ्याच नावाने तो सेव्ह करून ठेवला होता.

आता मात्र मन घट्ट करून तो कॉल मी उचलला आणि समोरून हॅलो असा आवाज आला. हॅलो मी मानस बोलतोय, इकडे काय बोलावं माझी तर बोबडीच वळली होती. पण तरीही बोलायला तर पाहिजेच म्हणून मी सुध्दा माझे नाव सांगितले सिमी. जवळ जवळ 15 मिनिटांत आम्ही खूप काही बोललं असे वाटत होते पण त्यातील जास्त शब्द त्याचेच होते मी फक्त ह हम ह असेच बोलत होते.

शेवटी न राहवून तो बोलला की तुला माझ्याशी बोलायला आवडत नाही का? यावर मी नाही नाही असे काही नाही ओ पण आताच आपली ओळख झाली आहे म्हणून जरा बाकी काही नाही. 25 मिनिटे झाली आणि मीच बोले फोन ठेऊ का कारण समोरून माझा मोठा भाऊ मला येताना दिसला. त्याने ही जास्त आढेवेढे न घेता फोन ठेवला, आता मला दिवस पुढे सरता सरत नव्हता कारण सारखी त्याच्या फोनची आतुरता माझ्या मनाला लागलेली असायची. तो सुध्दा दिवसभरातून 3 ते 4 call करायचा. आता आमचे बोलणे रोजचेच झाले होते पण फक्त मैत्री मधेच आम्ही बोलत होतो पुढचं पुढं जातच नव्हत.

तरीही रोज त्याचा फोन यावा आणि मी रोज त्याच्याशी बोलावं अगदी तासनतास असच वाटत होत. आता आमच्या मैत्रीला महिना झाला होता आणि आमच्यातील नात ही घट्ट झाल होत कारण आम्ही दोघंही एकमेकांच्या घरातील सुख दुःखाच्या गोष्टी शेअर करत होतो. शेवटी न राहवून त्याने एक दिवस मला विचारले सिमी मला तू खूप आवडतेस आणि तुझ्यासोबत संसार करायचं अस मी तरी ठरवल आहे पण तुझं मत काय आहे माझ्याबद्दल हे मला माहीत नाही तरीही आज मी तुला विचारतो आहे. माझ्यावर प्रेम करतेस का? सिमी ही याच प्रश्नाची वाट आज कित्तेक दिवस पाहत होती तिला आज जणु आकाश ठेंगणे झाले होते.

मनातील आनंद ती जगाला दाखवू शकत नव्हती पण मनातून ती खूप खुश झाली होती. हीच बातमी तिने आपली मैत्रीण मीना हिला सांगितली पण मीनाला अगोदरपासूनच मुलगा चांगला नाही असे वाटत होते. त्यावर ती पुन्हा बोलली बघ हा सिमी नाहीतरी तुझ्याकडून जे पाहिजे आहे ते मिळाले की तो तुला सोडून जाईल. पण तरीही सिमीचा तिच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. मानस आणि तिचे नाते आता खूप जवळचे झाले होते. म्हणून मानस ने तिला भेटायला येशील का म्हणून विचारले यावर तिने नकार दिला म्हणाली माझ्या घरात कळले तर त्याचे परिणाम वाईट होतील, आपण सध्या तरी न भेटलेले बरे पण आपण फोन वर बोलुयात ना, यावर मानस थोडा नाराज झाला होता.

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे सिमी मानसच्या फोनची वाट पाहत होती. सकाळी त्याचा फोन आलाच नाही तिने विचार केला कामात असेल, दुपारी करेल पण दुपारी ही त्याचा फोन आला नाही. दिवसभरातून एकही कॉल आला नाही. त्यामुळे सिमी खूप काळजीमध्ये होती. म्हणून सिमी ने कॉल केला पण तिचा कॉल लागला नाही. फोन बंद दाखवत होता. सिमीला काहीच कळत नव्हते आज मानसने फोन का नाही केला. तिने तिच्या मनातील मीनाला सांगितले. मीना म्हणाली काल काय बोलणे झाले होते तुमच्यात? यावर सिमी म्हणाली काल त्याने मला भेटायला येशील का म्हणून असे विचारले होते पण मी नाही म्हणाले.

यावर मीना म्हणाली मग बरोबर त्याला तुझ्यासोबत संसार करायचा नव्हता तर तसले चाळे करायचे होते आणि तू नाही म्हणालीस आणि त्याने फोन करने बंद केले इतकंच काय त्याचा आता फोन ही बंद लागतो आहे. इतकं ऐकल्यावर सुध्दा सिमीचा मानस वर विश्वास होता. आज नाय तर उद्या नक्की फोन करेल तो मला मी त्याच्या फोनची वाट पाहीन. आणि खरंच ती वेड्यासारखी त्याच्या फोनची वाट बघत बसायची जेवायची नाही. नुसती फोन हातात घेऊन बसायची. वेड्यासारखी त्याच्या फोनची वाट पाहत बसायची.

घरात कोणाला काहीच कळायचे नाही सिमी अचानक अशी का वागते. त्यांनी मीनाला विचारले तेव्हा तिने सर्व सांगितले घरातल्यांनी तिची खूप समजूत काढली पण ती त्याच्या प्रेमात खूप वेडी झाली होती, तिने एक दिवस मावशीच्या मुलाला फोन केला आणि मानस बद्दल विचारले त्याचे उत्तर ऐकून तर ती चकित झाली आणि चक्कर येऊन खाली पडली दुसऱ्या दिवशी ती हॉस्पिटलच्या वार्ड मध्ये एडमिट होती. काहीच बोलत नव्हती डॉक्टरांनी सांगितले ती कोमात गेली आहे आणि कधी शुध्दीवर येईल हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. काय होते तिच्या मावशीच्या मुलाचे वाक्य ज्यामुळे तिला इतका मोठा धक्का बसला ते म्हणजे मानस या जगात आता नाही आहे. त्याने एका अपघातात जीव गमावला आहे. हे ऐकुन सिमीला इतका मोठा धक्का बसला आणि आज तिची ही अवस्था आहे.

समाप्त

लेखक : पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल