Home कथा प्रेमाची अबोल सुरुवात

प्रेमाची अबोल सुरुवात

by Patiljee
15036 views

आज माझ्या बहिणीची म्हणजे मावशीच्या मुलीची हळद होती. भरपूर पाहुणे आले होते. काही ओळखीचे होते तर बहुतेक अनोळखी होते, पण तरीही त्या दिवशी दिवसभरातून तेच तेच चेहरे बघून बघून ओळखीचे वाटायला लागले होते. पण तरीही काही चेहरे सतत पहावेसे वाटत होते. त्यातील एक चेहरा होता त्याला प्रत्येक मिनिटाला पहावेसे वाटत होते. पहिल्यांदा त्याला पाहिले आणि खरंच असे वाटायला लागले होते की, लग्न करेन तर यांच्यासोबतच.

पहिल्या दिवशी त्याला पाहिले आणि त्याच्या प्रेमात पडले पण मला वाटतं होते त्याला मी आवडेल का? इतकी दिसायला सुंदर नव्हते पण तितकी वाईट नव्हते दिसायला , शाळेत असल्यापासूनच मला त्या गोष्टीचा अनुभव आला होता. म्हणजे सातवीत असल्यापासून माझ्यावर कोणीतरी प्रेम करावं अशी भावना निर्माण झाली होती, खरतर प्रेम म्हणजे काय याचा खरा अर्थच तेव्हा मुळात म्हाईत न्हवता तरीही मनापासून वाटायचं माझ्याकडे कोणीतरी पहावं, सतत पहावं माझ्या प्रेमात वेड व्हावं, मला प्रेम पत्र पाठवावे असा कोणीतरी असावा जो माझ्यावर खूप प्रेम करणारा असावा आणि कदाचित ते वय ही तसच होतं. म्हणून तशा माझ्या भावना ही होत्या.

आणि मनात जशी इच्छा होती तशीच मूलही पाठी लागलेली असायची पण त्यातील एकही मला आवडला नव्हता, फ्रेंडशिप व्हावी असं वाटायचं पण त्यांच्यासोबत त्या प्रकारचं नातं कधीच निर्माण झालं नाही किंवा त्या प्रकारचं जीव लावावं अस कोणी भेटलं नव्हतं. आज मला अस वाटतयं की मला एक मुलगा आवडायला लागला आहे. पण मी त्याला आवडते की नाही हे मला माहीत नव्हते, पण कदाचित त्याच्या नजरेतून वाटायचं की त्याला ही मी आवडत असेल दिसायला तसा तो स्मार्ट होता. उंचीला मस्त होता. गोरा पान आणि चिकना.

त्याच्या आजूबाजूला सतत मुली असायच्या वाटायचं यांच्यातून आपला नंबर येईल असे वाटत नाही पण तरीही मनात एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती, हळदीच्या दिवशी रात्री नाचताना सतत माझी नजर त्यालाच शोधत होती. माहीत नाही पण त्या दिवशी हळदीला खूप सुंदर मुल होती पण माझा जीव त्याच्यातच अडकला होता.

मला सतत कोणीतरी ओढून नाचायला घेऊन जायचे पण त्या दिवशी मनात असूनही नाचता येत नव्हते. कारण माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, इतके की नाचायचे म्हटले तरी धाप लागायची. म्हणतात ना की प्रेम झाल्यावर माणसाला कशाचेच भान नसते तसेच माझे झाले होते, पण प्रेम भावना जेव्हा माणसाच्या मनात असते ना तेव्हा त्याला सगळे जगच सुंदर वाटत असते.

त्याच रात्री माझ्या मावशीचा मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला सुरभी लक्ष कुठे आहे तुझे? आज अख्खा दिवस पाहतोय तू वेगळीच वागत आहेस. आणि हो एक गोष्ट मला तुला सांगायची आहे पण तुझी ऐकायची इच्छा नसेल तर जाऊदे मी नंतर सांगतो, त्यावेळी मला वाटले हा उगाच काहीतरी फालतू गोष्ट सांगत असेल जाऊदे लक्ष नको द्यायला याच्याकडे आणि मावशीचा मुलगा काहीच न बोलता निघून ही गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न झाले लग्नात त्याने ही माझ्याकडे खूपदा पाहिले पण मला वाटतं होते की कदाचित तो असाच पाहत असेल.

लग्न उरकले नवरा नवरी गेले तो गेला असेल कदाचित त्याच्या घरी मी सुध्दा माझ्या घरी आले पण पहिल्यांदा काहीतरी अर्धवट राहिल्या सारखे वाटत होते, दिवसभरात सतत त्याचीच आठवण तोच चेहरा सतत डोळ्यासमोर येत होता, त्याच रात्री मावशीच्या मुलाने मला फोन केला म्हणाला अग सुरभी तुला मला काहीतरी सांगायचे आहे पण तू त्या दिवशी माझं ऐकूनच घेतलं नाहीस तुला तो मुलगा माहीत आहे ताईच्या लग्नात आलेला उंच, गोरा पान इकडे माझ्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते.

कारण आता काय ऐकायला मिळेल याची भीती वाटत होती, पण तो तितक्यात म्हणाला अग त्याला तु खूप आवडली आहेस त्याने तुझ्याबद्दल माझ्याकडे चौकशी केली आणि तुझं नंबर ही घेतला आहे माझ्याकडून. मी नव्हतो देणार पण एक मन बोले देऊन टाक, सॉरी हा सुरभी. असे बोलून त्याने फोन ठेवला आणि माझ्या प्रेमाची बाग आता फुलायला सुरुवात झाली होती.

भाग दोन इथे क्लिक करून वाचा

लेखक : पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल