आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूच्या पत्नी बद्दल सांगणार आहोत जी सध्या इंटरेटवर धुमाकूळ घालत आहे. आपल्या प्रत्येक फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तुम्हा आम्हाला तर माहितीच आहे की भारतीय क्रिकेट मधील अनेक खेळाडूंची लग्ने झाली आहेत आणि काही खेळाडू ह्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. तुम्ही वर जो फोटो पाहत आहात ती मुलगी भारतीय जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ह्याची पत्नी आहे. तुमच्यापैकी खूप कमी लोकांना माहिती असेल हे, पण ज्यांना माहीत नसेल ही बातमी त्यांच्यासाठी आहे.
ईशांत शर्माने आपल्या गोलंदाजीने अनेक सामने भारताला जिंकवून दिले आहेत. सध्या एकदिवसीय सामन्यात जरी तो खेळत नसला तरीही कसोटी संघात त्याची जागा कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. अचूक आणि बाऊन्स गोलंदाजी साठी तो प्रसिद्ध आहे. ह्याच बरोबर आयपीएल मध्ये सुद्धा त्याची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. त्याच्या क्रिकेट प्रमाणे वयक्तिक आयुष्यात सुद्धा तो आपल्या पत्नी मुले चर्चेत आला आहे.

इशांतने प्रतिमा सिंग शर्मा सोबत लग्न केलं आहे. प्रतिमा २९ वर्षाची आणि खूप सुंदर आहे. २०१६ मध्ये ह्या दोघांनी लग्न केलं होतं. प्रतीमाचा जन्म वाराणसी इथे राजपूत कुटुंबात झाला आहे. आणि महत्वाची एक गोष्ट अशी की तुम्हाला माहीत नसेल की प्रतिमा राष्ट्रीय बास्केटबॉल संघात सुद्धा खेळली आहे. तिच्या बहिणी सुद्धा राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल सध्या खेळत आहेत. उत्तर प्रदेश मध्ये २००३ मध्ये तिने आपला पहिला सामना खेळला होता.
आजपर्यंत तिने अनेक अवॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. ह्यात टॉप स्कोरर ऑफ द टुर्नामेंट (सिनियर नॅशनल बास्केटबॉल चॅम्पियनशिप चेन्नई २०११ ते २०१६), श्री प्रकाश ज्योती अवॉर्ड २००९-२०१०, सेंचुरी स्पोर्ट्स अवॉर्ड २०१०, स्पोर्ट्स वूमन ऑफ द इअर २००८-२००९, बेस्ट प्लेअर इन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ह्यांचा समावेश आहे. जरी तिची ओळख ईशांत शर्मा ह्याची पत्नी अशी आहे तरी सुद्धा तिने वयक्तिक आयुष्यात आपल्या हिमतीवर आपले आणि भारताचे नाव उंचावले आहे.