काही अभिनेत्री या फक्त टीआरपी आणि पैशासाठी काहीही करायला तयार असतात हे आपल्याला ही वाचून कळेलच खर तर आपणही आपल्या आयुष्यात पैसा कमावण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो पण अशा प्रकारे लग्नाचा घाट घालत नाही. कारण आपल्या सर्वसामान्य लोकांना आपल्या इज्जतीची जास्त काळजी असते. पण हे कलाकार याकडे दुर्लक्ष करतात बघा कोण कोण आहेत ते सध्या बिग बिस 13 हा शो संपला आणि हा शो संपल्यानंतर लगेचच चॅनलने त्यातील स्पर्धक पारस छाबड़ा आणि शहनाज गिल यांनी घेऊन एक शो करत आहेत ‘मुझसे शादी करोगे’ हे त्याचे नाव आहे आणि हा शो सुधा टीआरपी साठीच करण्यात आलेला आहे.
राखी सावंत
टीव्ही शो ‘राखी का स्वयंवर’ हा 2009 या साली पाहायला मिळाला होता. या शो मध्ये ही राखी सावंत हिच्यासाठी एक योग्य जोडीदार निवडण्याचे काम होते पण या शो मध्ये वाहवा पेक्षा जास्त थट्टा उडवली गेली आणि यामुळे राखीची इमेज ही खालावली गेली. राखीचे लग्न ही ह्या शो मार्फत झाले होते पण हे लग्न टिकलेले आपल्याला यापुढे जाऊन पाहायला मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी राखीने. आपण परत एकदा आपण लग्न केले आहे आणि नवरा NRI आहे म्हणून सांगितले आहे. त्याच्या नावाचे कुंकू सुद्धा ती लावताना दिसत आहे. पण तिचा नवरा कोण आहे हे तिने अजुन सांगितले नाहीये. लोक ह्याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत.
सारा खान आणि अली मर्चेंट
बिग बॉस सीजन 4 या शो मधील स्पर्धक सारा खान आणि अली मर्चेंट या दोघांनी ही 2010 साली आपले लग्न केले होते आणि ते आपल्याला ही पाहायला मिळाले होते पण त्यांचा 2 महिन्यांमध्ये लगेच घटस्फोट झाला या त्यांच्या सीजन मधे या शो ला खूप टीआरपी मिळाली होती.
नेहा कक्कड़ आणि आदित्य नारायण
इंडियन आयडॉल 11 या सेट वर तुम्हाला नेहा कक्कड़ आणि आदित्य नारायण या दोघांच्या प्रेमाची आणि लग्नाचीच जास्त चर्चा होत असताना आपण पाहिले आहे या दोघांचे ही चाहते या बातमी मुळे आनंदी झाले होते. नेहा या शो मध्ये एक जज होती तर आदित्य नारायण हा शो होस्ट करत होता. या बातमीने या शो ला खूप चांगली टीआरपी दिली पण शेवटी समजले की हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट होता.