प्रसाद ओक मंजिरी या दोघांची पहिली भेट एका शिबिरादर्म्यान झाली होती. यात प्रसाद ओके यांनी पुण्यामध्ये अभिनयचे शिबिर घेतले होते. त्या ठिकाणी मंजिरी ही सुद्धा एक विद्यार्थी म्हणून आली होती. आता ही मंजुरी कोण होती बरं, तर प्रसाद ओकचा एक खास मित्र त्याची ही बहीण म्हणजे मंजिरी होय. हे शिबीर जवळ जवळ तीन महिन्यांचे होते आणि अर्थातच कोणतीही व्यक्ती तुमच्या जास्त दिवस आसपास राहिल्यास तुम्हाला तिच्याबद्दल आपलेपणा वाटतो तसेच या दोघांचे झाले दोघेही या तीन महिन्यात एकमेकांच्या खूप जवळ आले होते.
शिबिरामध्ये दोन नाटके बसवण्यात आली होती पण या दोन्ही नाटकात मंजिरी हिने भाग घेतला नव्हता. कारण तिचं सगळं लक्ष प्रसाद ओक यांच्याकडे होते. त्यांचे हावभाव, अभिनयाची लकब या सगळ्याकडे मंजिरी अगदी निरखून पाहत होती. त्यानंतर प्रसाद ओक यांनी मंजिरी हिच्या साठी एक नाटक करण्याचे ठरवले आणि त्या नाटकामध्ये या दोघांचे काम आहे या नाटकाचे नाव आहे “क्रॉस कनेक्शन”. पहिल्यापासून या दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुलले होतेच पण या नाटकाच्या दरम्यान ते अधिक घट्ट झाले.
शिबिराच्या वेळी मंजिरी हिचे वय होते फक्त 16 वर्ष आणि तरीही लग्नाचे पाहिले प्रपोजल हे स्वतः मंजिरी हिने प्रसाद ओक यांच्यापुढे ठेवले आणि प्रसादने ते हसून हसून स्वीकार केले.

पण मला अभिनय करायला खूप आवडतो आणि मला यांच्यातच पुढे करीयर करायचे आहे त्यामुळे तुझ्या घरातल्यांना पाहिले अभिनेता म्हणून जावई असेल तरच माझं प्रेम स्वीकार कर, कारण त्या वेळी मराठी इंडस्ट्रीला इतके चांगले दिवस आले नव्हते. पण तरीही मंजिरी हिने आपल्या प्रेमावर विश्वास ठेवला आणि आपले नाते असेच चालू ठेवले. त्यानंतर हळू हळू प्रसाद ओक याने अभिनायमधे आपले पाय घट्ट रोवले होते. पहिल्यांदा त्यांच्या लग्नाला दोन्ही कडून विरोध होता. पण दोघांचे अतूट प्रेम पाहून हे विरोध ही मावळले आणि 7 जानेवारी 1998 ला दोघांचे लग्न झाले. प्रसाद ओक एक उत्कृष्ट अभिनेता आणि डायरेक्टर म्हणून सध्या काम करत आहे.
त्याच्या हिरकणी ह्या सिनेमाला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. सध्या सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या कॉमेडी शो मध्ये तो सई ताम्हणकर सोबत जज (सरपंच) म्हणून काम करत आहे.