पोट मळल्यामुळे किंवा पोटाची मालिश केल्यामुळे आपल्या पोटासंबधी अनेक आजार पळून जातात हे तुम्हाला माहीत आहे का? आपण आपल्या घरात जन्माला आलेल्या लहान बाळाला जसे मालिश करतो त्याचे पूर्ण शरीर मळून काढतो. त्याचबरोबर पोट ही मळतात, त्यामुळे त्या बाळाचे पोटाची पचनसंस्था सुरळीत चालते. त्याला गॅस किंवा पचनाचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे आपण मोठ्यांच्याही पोटाची मालिश करून त्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचवू शकता. पोट मळल्यामुले पोटाच्या अनेक तक्रारी दूर होतात त्याशिवाय पोटाच्या मांसपेशी मजबूत होऊन तसेच बद्घकोश्ठा चां त्रास ही कमी होतो.
पहिल्यांदा सरळ झोपा आणि तळहातावर तेल घेऊन पोटाला गोलाकार फिरवून मालिश करा.
कमीत कमी रोज तीन मिनिटे तरी पोटाची मालिश करा. त्यामुळे नक्की फरक तुम्हाला जाणवेल. तुम्हाला जर गॅस ची समस्या असेल किंवा आम्लपित्त अपचन यांसारख्या समस्या असतील तर त्यापासून तुम्हाला आराम मिळेल.
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तरी हा उपाय करू शकता. यामुळे तुमची पचनक्रिया उत्तम चालते आणि हळू हळू तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखण्यापासून आराम मिळविण्यासाठी आपण लवंगा, दालचिनीच्या तेलाने ओटीपोटावर मालिश देखील करू शकता.
विनाकारण तुमचे पोट दुखत असेल तर अशा वेळी केलेली पोटाची मालिश फायदेशीर ठरते. त्यामुळे पोटातील स्नायूंना ऊब मिळते आणि यामुळे तुम्हाला आराम मिळतो.