Home करमणूक ओळखलं का या ताईंना, एका गाण्याने या ताईंना प्रसिद्धीच्या झोतात नेऊन ठेवले आहे

ओळखलं का या ताईंना, एका गाण्याने या ताईंना प्रसिद्धीच्या झोतात नेऊन ठेवले आहे

by Patiljee
4012 views

सध्याच्या काळात सोशल मीडिया इतका वाढला आहे की यातून प्रत्येक जण आपली मते मांडत असतो. सुख असो किंवा दुःख प्रत्येक क्षण तो सोशल मीडियावर शेअर करत असतो आणि एखादी पोस्ट लोकांना आवडली की तो चेहरा प्रसिद्ध झालाच म्हणून समजा. असाच एक चेहरा आहे सध्या टिक टॉक वर तुफान वायरल झाला आहे. श्रीगोंद्याच्या पूनम तुपे या ताई सध्या आपल्या व्हिडिओ मधून इतक्या लोकांना आवडू लागल्या आहेत की त्याच्या व्हिडिओला लाखो लाईक असतात शिवाय या ताईंच्या अकाउंटला व्हिडिओंना ५० लाख लाईक्स १ लाख ६८ हजार इतके फॉलोअर्स आहेत.

ह्या ताई श्रीगोंदा तालुक्यात पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहतात. त्यांचे शिक्षण सातवी पर्यंत झाले आहे. त्यांनी आपले घर टिक टॉक वर ही दाखवले आहे. खूप साधी राहणी आहे त्यांची, त्यांच्या प्रसिद्धीला आणखी एक कारण म्हणजे त्यांचे गाजलेले गाणे कोणते बरे? म्हणून मी काय वेड्यावाणी करते. तुम्ही ऐकलेच असेल हे गाणे इतके लोकांना आवडले आहे की या गाण्यावर लोक आपली कलाकृती सादर करत आहेत. DJ Sagar ह्या कोल्हापूर कर युवकाने हे गाणं एडिट केलं होतं.

पूनम ताई यांचे लग्न २००८ साली संजय तुपे यांच्यासोबत झाले आहे. त्यांचे पती एका कीराण्याच्या दुकानात हमाली करतात. आणि त्या स्वतः हा ही शिलाई काम करतात. पूनम ताईंनी काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाईल मध्ये हा एप्लिकेशन्स डाउनलोड केला आणि त्यानंतर त्यांनी आपले व्हिडिओ ह्याच्यावर टाकायला सुरुवात केली. पण यावर काहींनी निगेटिव्ह कमेंट करायला सुरुवात केली ” बया जरा वेडी आहे” असे शब्द वापरू लागले आणि या लोकांच्या शब्दांना या ताईंनी चांगलीच प्रतिक्रिया दिली या ताईंनी “म्हणूनच मी लय वेड्यावाणी करते’, हा व्हिडिओ टिक टॉक वर टाकला.

त्यांनी आपल्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या कमेंटवर व्हिडिओ बनवल्या आहेत. त्याच्यातून त्या आनंद घेत असतात लोक त्यांना वेडी म्हणतात पण तरीही त्यांनी मनाला लाऊन न घेता त्यावर गाणे बनवले आणि हेच गाणे लोकांनी आता डोक्यावर घेतले आहे. तुम्ही जेव्हा प्रसिध्दी कडे वळत असता तेव्हा चांगली वाईट लोक तुमच्या वाट्याला येत असतात. चांगल्या लोकांना सोबती घेऊन वाईट लोकांना आपली प्रसिध्दी दाखवून पुढे जायचे. कारण जळणारे हे काहीही चांगलं वाईट केलं तरी जळतच राहणार.

सध्या TikTok Vs YouTube असे महायुद्ध तुम्ही अनेक ठिकाणी पाहतच असाल. पण काहीही अशीही लोक असतात ती चांगला कंटेंट देऊन लोकांना कधी हसविण्याचा तर कधी आनंद देण्याचा प्रयत्न करतात. तेच खरे क्रिएटर असतात.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल