पूजा बेदी हे नाव आपल्यासाठी नवीन नाहीये. अनेक चित्रपटात त्यांना आपण पाहिले आहे. कबीर बेदी ह्यांच्या त्या कन्या आहेत हे सर्वानाच माहीत असेल. १९९१ ते १९९५ काळात त्यांनी बॉलिवुड मधील अनेक सिनेमात काम केली होती. ह्यात विषकन्या, चित्तमा मोगदू, जो जिता वही सिकंदर, फिर तेरी कहानी याद आई, लूटरे, आतंक ही आतंक आणि शक्ती ह्यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
याचबरोबर टेलिव्हिजन क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केली आहेत. झलक दिखलाजा, नच बलिये, बिग बॉस २ आणि ५, खतरों के खिलाडी, मा एक्सचेंज ह्या शोचा समावेश आहे. नंतर मात्र आपण खूप कमी वेळा त्यांना स्क्रीनवर पाहिले. पण आज आम्ही तुम्हाला अलाया फर्निचरवाला ह्या त्यांच्या मुलीबद्दल सांगणार आहोत. जिने आताच बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. तिचा जन्म २८ नोव्हेंबर १९९७ मध्ये झाला आहे. मुंबईमध्ये तिने आपले शिक्षण जमनाबाई नरसी स्कूल मध्ये केले आहे. चित्रपटात पदार्पण करण्या अगोदर तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी मध्ये अभिनयाचा कोर्स केला आहे.

अलायाने कथक डान्स सुद्धा शिकला आहे. पूजा बेदी आणि फरहान फर्निचरवाला ह्यांची कन्या आहे. पण ह्या दोघांनी २००३ मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे झाले आहेत. सिंगल आई म्हणून पूजा बेदिने आपल्या मुलीचे संगोपन केलं आहे. ह्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या जवानी जानेमन ह्या सिनेमात तिने सिने सृष्टीत पदार्पण केले आहे. सैफ अली खान, तब्बू, चंकी पांडे ह्या सारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे. तिला अभिनयाचे धडे तर आपली आई पूजा बेदी आणि आजोबा किरण बेदी ह्यांच्याकडून मिळाले आहेत.
तुम्हाला अलाया बद्दल माहीत होत का? आम्हाला आवर्जून कळवा.