भारतातील आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती ह्यांना गलेलठ्ठ वेतन दिले जाते. भारतीय पंतप्रधान ह्यांना दर महिन्याला २ लाख ८० हजार एवढे वेतन मिळते तर राष्ट्रपतींना दर महिन्याला ५ लाख वेतन मिळते. तर भारतातील आमदारांना ५० हजार एवढे वेतन मिळते. (मिळालेली वेतनाची आकडेवारी गुगल वरून घेण्यात आली आहे) इतर देशांपेक्षा हे खूप जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाच्या पंतप्रधान बद्दल सांगणार आहोत ज्यांचे वेतन आपल्या देशातील आमदारांच्या वेतनापेक्षा कमी आहे.
भारतातील सर्वाधिक शिक्षण घेतलेला माणूस मराठी आहे आणि आपल्याला माहीत देखील नाही
नेपाळ आणि भारतात सध्या खटके उडाले आहेत. नेपाळ मधील पंतप्रधानाना ७७ हजार वेतन मिळते पण त्यांच्या चलणापेक्षा आपल्या चलनाचे मूल्य जास्त आहे. आपले १०० रुपये तर तेच त्यांचे ६२.४४ रुपये होतात. जर आपण ह्या पंतप्रधानांचा पगार आपल्या चलनात रूपांतरित केला तर त्यांना फक्त ४८ हजार भारतीय रुपयानुसार वेतन मिळत. भारतातील आमदारांना मिळणाऱ्या वेतानापेक्षा हे कमी आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांना पाच हजार रुपयाचा मोबाईल भत्ता तर १० हजार रुपयाचे इतर भत्ते मिळतात. जर त्यांना इतर राज्यात किंवा इतर प्रदेशात प्रवास करायचा असेल तर त्यांना प्रत्येक दिवसाचा ३ हजार रुपये भत्ता मिळतो. ह्याच बरोबर त्यांच्याकडे असलेल्या सरकारी गाडीसाठी त्यांना महिन्याला ३०६ लिटर पेट्रोल किंवा डीझल मिळतं. सध्या नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली आहेत.
एवढे सर्व असताना देखील ह्या युद्धजन्य परिस्थितीत नेपाळ ने चीनला सहाय्य केलं आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणाहून नेपाळवर टीका होत आहे. हे पण वाचा : तुमच्या मोबाईल मध्ये हे ५९ अँप असतील तर उडवून टाका, भारताने ह्या अँप वर बंदी घातली आहे