Home विचार प्लास्टिकची निर्मिती आपल्यासाठी शाप आहे की वरदान तुम्हाला काय वाटते?

प्लास्टिकची निर्मिती आपल्यासाठी शाप आहे की वरदान तुम्हाला काय वाटते?

by Patiljee
464 views

जेव्हा प्लास्टिकचा शोध लागला तेव्हा ती आपल्यासाठी एक आश्चर्यजनक आणि गरजेची अशी गोष्ट होती. पण आताच्या काळात इतके प्लास्टिक वाढले आहे की जगभरातील काही देशांत प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी केली आहे. कारण प्लास्टिकचा वापर हा इतका होऊ लागला आहे की त्यामुळे आपल्या धरतीवरील काही प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर मित्रानो खरच का प्लास्टिक आपल्या साठी इतका घातक आहे की नाही? कारण प्लास्टिक शिवाय या जगाचे काय होईल याचा विचार ही आपण करू शकत नाही.

Source YouTube

पहिल्यापासून हा आपल्यासाठी नेहमी वरदान ठरत आला आहे खर तर चुकीचे वागतो तो फक्त माणूस कारण ज्या तऱ्हेने आपण याचा वापर करत आलेले आहोत. जसं की प्लास्टिक हा आपल्या आयुष्यातील एक जागा बनली आहे यासाठी तुम्ही तुमच्या आसपास नजर फिरवून तर बघा अशा कितीतरी वस्तू असतील ज्या प्लास्टिक ने बनलेल्या असतील उदा. मोबाईल, एसी, टीव्ही, बाईक अशा अनेक गोष्टी प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. तुमच्या घरातील भरपूर अशा उपयोगी गोष्टी आहेत त्या प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी इतक्या प्रमाणात लोकसंख्या नव्हती त्यामुळे कापसापासून कपडे बनवले जात होते. पण आज लोकसंख्या इतकी वाढलेली आहे की त्यांच्यासाठी आपण नैसर्गिक धाग्याचे कपडे नाही बनवू शकत.

त्यासाठी नायलॉन, अॅक्रालिक आणि पॉलिस्टर यांसारख्या वस्तूंचा वापर करणे भाग आहे आणि हे सुद्धा प्लास्टिक पासून बनलेले आहे. आता आपण जी इलेक्ट्रिसिटी साठी वापरतो ती वायर घ्या त्याच्याभोवती असणाऱ्या प्लास्टिकच्या आवरणामुळे आपके शॉक पासून रक्षण होते. शिवाय आता बाजारात प्लास्टिकचे बल्ब आणि ट्यूब ही आले आहेत कारण जगामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या बनविणे प्लास्टिक शिवाय शक्यच नाही आणि शक्य झालेच तर त्याचे मूल्य हे आपल्या खिशाला परवडणारे नसेल. शिवाय मार्केट मध्ये ज्या खायच्या वस्तू मिळतात त्यांचे पॅकिंग हे ही प्लास्टिक पासून बनलेले असते. तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मार्केट मधून सामान आणण्यासाठी प्लास्टिक पिशव्या का वापरत असतो? कारण आपल्या मध्ये आळस आणि विसराळूपणा या कारणामुळे आपण या प्लास्टिकच्या पिशव्या जास्त वापरू लागलो आहोत.

तर या प्लास्टिक च्या पिशव्या ऐवजी आपण कागदी पिशव्या वापरू शकतो का तर नाही हे ही चुकीचे आहे कारण यासाठी आपल्या निसर्गाची जास्त हानी होऊ शकते कागडासाठी झाड कापली जाऊ शकतात आणि म्हणून इतक्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या जगाला आपण प्लास्टिक शिवाय राहण्याच्या विचार नाही करू शकत. आणि जर खरंच मुळापासून आपण जर का ह्या प्लास्टिक वर रोख आणली तर विचार करा कितीतरी प्लास्टिक कंपन्या बंद होतील त्यातील कामगार बेरोजगार होतील. शिवाय आपण ही त्यांच्याईतके गुन्हेगार आहोत कारण आपण त्याचा वापर आपल्याला हवा तसा करत असतो. म्हणून पशू पक्षी आणि समुद्रातील मासे कासव यांचा जीव जातो आहे. तसेच या प्लास्टिक पिशव्या मुळे आपल्याला पुराचा सामना करावा लागतो.

Source Iloveqatar

पण याचे मुख्य कारण कोण आहे प्लास्टिक नाही तर त्याला आपण स्वतः जबाबदार आहोत आपणच या प्लास्टिकच्या बॅगा हव्या तशा फेकत असतो तसे न करता त्यांना एका ठिकाणी गोळा करायला हवंय शिवाय एक प्लास्टिक ची वस्तू तिचा वापर अनेक वेळा करायला हवा. म्हणून आपले जीवन हे प्लास्टिक शिवाय अपूर्ण आहे यासाठी आपण प्लास्टिकचा उपयोग आपल्या गरजेनुसार आणि आवश्यक असेल तितकाच करावा त्यामुळे आपला निसर्ग आणि जीव जनावरे हे सुरक्षित जीवन जगू शकतील.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल