Home कथा माझी लवस्टोरी My Real Lovestory

माझी लवस्टोरी My Real Lovestory

by Patiljee
9079 views

अनेक कथा लिहताना कधी वाटलं नव्हतं की स्वतःची कथा अशी तुमच्या पर्यंत सादर करेल. पण अनेकांनी मेसेज केले की आम्हाला तुमची कथा वाचायची आहे. म्हणून तुमच्यासमोर माझ्या आयुष्यातील एक पान व्यक्त करतोय.

माझी आताच दहावी पूर्ण झाली होती. सारखे अभ्यासामुळे इतर मुलाप्रमाणे मी सुद्धा कंटाळला होतो पण दहावीचे वर्ष हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे मीे आपले सर्व लक्ष अभ्यासाकडे वळवले होते. पण आता परीक्षा संपल्यामुळे खूप खुश होतो. पुढच्या दोन तीन महिन्याच्या सुट्टीत काय काय करणार याची धोरणे तयार करत होतो. शेवटी काय काहीच करता येत नाही फक्त आराम एवढेच चालू होते. असेच खूप दिवस हळू हळू लोटत होतो. आपल्या मोबाईल वेळ घालवून दिवस काढत होतो.

असाच एका संध्याकाळी माझा फोन वाजला. समोरून एक गोड आवाज माझ्या कानी आला. “दिपेश मी रुपाचे बुक आणले आहेत पण तिचा फोन लागत नाही आहे, जरा तू येशील का घ्यायला नाक्यावर” हे तिचे पहिले गोड शब्द. मी तिला सांगितले की सॉरी हा रुपेश चा नंबर नाही आहे, माझे नाव महेंद्र. तेव्हा तिने पटकन सॉरी बोलून फोन ठेवून दिला. पण त्या मुलीचा आवाज एवढा गोड होता की माझ्या कानात सारखाच रेंगाळत होता. परत तिला कॉल करावा का? असे खूप वेळा मनात आले पण…. कॉल करून बोलणार काय? हा पण विचार डोक्यात होताच. म्हणून माझ्या मनाला जरा सावरून मी तिचा नंबर True Caller वर सर्च केला तर तिथे गणेश पवार असे नाव मला दिसले. मी नंबर व्हॉटसअपला चेक केला पण तिथे तो नंबर अॅक्टिव नव्हता. माझ्या सर्व आशाच मावळून गेल्या होत्या.

मला तो आवाज काही करून परत ऐकायचा होता. पण मी काहीही करू शकत नव्हतो. पण कदाचित देवाच्या मनात आम्ही परत बोलावे असेल म्हणून मला तिचा समोरून मेसेज आला “सॉरी हा actully मला ना माझ्या मैत्रिणीच्या भावाला फोन लावायचा होता पण चुकून तुम्हाला लागला सॉरी” खरे तर अशी चूक रोज व्हावी असे मला वाटत होते. मी पण तिला रिप्लाय दिला की its ok होत कधी कधी असे. आणि परत तिच्या मेसेज वाट बघत बसलो. पण समोरून काहीच मेसेज आला नाही.

दोन दिवस गेले तरी तिचा रिप्लाय मला आला नव्हता. मी खूप अस्वस्थ झालो होतो कारण मला तिचा तो गोड आवाज परत ऐकायचा होता. शेवटी न राहून मीच तिला शुभ प्रभातचा मेसेज केला. काही वेळातच तिचा फोन आला कोण आपण?? मी थोडा घाबरलो. काय उत्तर देऊ कळत नव्हते. शेवटी म्हणालो मी महेंद्र त्या दिवशी आपले चुकून फोनवर बोलणे झाले होते ना तो मुलगा. तिने पण ओके म्हणून फोन ठेवून दिला. पण नंतर तरीसुद्धा काहीच समोरून रिप्लाय येत नव्हता. माझे मन तिच्या त्या गोड आवाजात अडकले होते पण तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता.

मी परत तिला मेसेज केला की मी मेसेज केलेले आवडत नाही का तुला? तसे असेल तर सांग मग नाही करणार मी परत मेसेज. तिचा थोड्यावेळाने रिप्लाय आला. अरे असे काही नाही जरा बिझी होते. बोल आता. काय करतोस तू? कुठे राहतोस? आणि खरंच सॉरी हा त्या दिवशी चुकून फोन लागला होता. मी पण तिच्या मेसेजचे एक एक करून रिप्लाय देत होतो आणि ती सांगत होती मी ऐकत होतो. असेच आमची हळू हळू बोलणे वाढत गेले. बोलणे एवढे वाढत गेले की आम्हाला एकमेकांशिवाय करमत नव्हते. रोज एक तास तरी आम्ही फोनवर बोलायचो पण ती दिवसातून फक्त एक ते दोन तासच बोलायची पण खूप बोलायची. तिला गाणी गायची खूप आवड होती. रोज मला एकतरी गाणे ऐकवायची. तिचा आवाज एवढा मधुर होता की मला तर सारखे असेच वाटत होते की तिने फक्त गातच राहावे आणि मी ऐकत राहावे. तिचा आवाज मी आजही माझ्या मोबाईल मध्ये जपून ठेवला आहे.

एक दिवस तिचा फोन मला आला, तिच्या बोलण्यात आज जरा जास्त गोडवा दिसून येत होता. महेंद्र मला तुला काहीतरी सांगायचे आहे. पण कसं सांगू कळत नाही. मला वाटले नेहमी प्रमाणे काहीतरी सांगायचे असेल पण तिने साक्षात स्वतःहून मला प्रपोज केले. मला आजही तिचे ते गोड शब्द कानात ऐकू येतात. “माही मला काहीच कळत नाही आहे रे, सर्व कडे तुझाच भास होतोय, मी प्रेमात पडलीय रे तुझ्या. I LOVE YOU Mahi” मला पण हेच हवे होते पण तिला मी हो म्हणू शकलो नाही कारण आजपर्यत आमचे फक्त फोनवर बोलणे झाले होते. समोरासमोर आम्ही एकमेकांना पहिले सुद्धा नव्हते. ती कशी दिसते आणि मी कसा दिसतो हे आम्हा दोघांना पण माहीत नव्हते. मी दिसायला सावळा होतो त्यामुळे कदाचित मी तिला असे सांगितले की हे बघ आपण अजुन एकमेकांना पाहिले नाही आहे. आपण एक दिवस भेटूया जर का तुला मी किवा मला तू आवडलीस तर आपण पुढे जाऊ. खरे तर मला तिला त्या क्षणीच सांगायचे होते की तूच माझी होणारी बायको आहेस पण तेव्हा मी तसे का वागलो याचे उत्तर अजुन मला मिळाले नाही आहे.

१६ मे २०१० आमच्या भेटीचा दिवस ठरला. मला आजही आठवत आहे तो दिवस. कदाचित कधीच विसरू शकणार नाही मी ते. पनवेलला भेटण्याचे ठरले होते आमचे. मी पनवेल बस स्टॉपवर आधीच पोहचून तिची वाट बघत बसलो होतो. ती कशी असेल ? तिला मी आवडेल का? की मला बघूनच पळून जाईल? असे खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते. कारण आम्ही एकमेकांना पाहिले सुद्धा नव्हते. तिचा फोन वाजला अरे कुठे आहेस तू मी बस स्टॉपवर पोहचले आहे. तिकीट काउंटरच्या बाजूला उभी आहे.

मी लगबगीने तिथे पोहोचलो. फोन हातात चालूच होता. मी तिला लांबूनच विचारले कोणता ड्रेस घातला आहेस तू? तिने लाल म्हणून सांगितले मी लाल कलर शोधत होतो आणि मला समोर एक परी सारखी दिसणारी मुलगी दिसली जिने लाल कलरचा छानसा ड्रेस घातला होता. मस्त काळेभोर डोळे, लांब केस अगदी कंबरेखाली येत होते आणि समोर येणारी केसांची छोटी बट. खरंच अगदी परीच दिसत होती ती. आणि तीच माझी सोनाली होती. माझा तर माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की एवढी सुंदर मुलगी मला का म्हणून हो बोलेल. मला तर असे वाटत होते की इथूनच पळून जावे. पण हिम्मत करून मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. हा बघ मी असा दिसतोय.

सोनालीने मला खालून वर पाहिले आणि एवढेच बोलली बोला पाटीलजी साहेब कुठे नेणार मग आम्हाला? तिने पहिल्यांदा मला पाटीलजी असे संबोधले म्हणून हेच नाव तुम्ही माझ्या सर्व पेजमध्ये बघत आहात. तिचे हे असे हसून बोलणे माझ्यासाठी ग्रीन सिग्नल होता. पण मला खरंच विश्वास बसत नव्हता की एवढी सुंदर मुलगी मला कशी पटेल. आम्ही त्या दिवसभर सिनेमा पाहिला बीचवर गेलो आणि खूप गप्पा सुद्धा मारल्या. घरी जाताना परत तिने मला प्रश्न केला आता तरी पाहिलेस ना मला मग काय हो की रडू आता मी? आणि माझ्याकडे नाही बोलण्याचे कारणच नव्हते कारण अशी मुलगी मला शोधून पण सापडणार नव्हती. मग पुढे रोज आमचे मेसेजवर बोलणे फोनवर बोलणे हे चालूच होतें. वेळ काढून आम्ही एकमेकांना भेटत सुद्धा होतो.

पण काही दिवस झाले तिचा मेसेज कीवा कॉल काहीच आला नव्हता. मी थोडा अस्वस्थ होतो. पण कदाचित ती आजारी असेल किंवा घरात काही प्रोब्लेम असेल म्हणून ती मेसेज करत नसेल असे मी स्वतःला समजावत होतो. पण एक हप्ता झाला एक महिना झाला पण सोनालीचा काहीच पत्ता नव्हता. आता मात्र मला खूप टेन्शन आले. पण तिला शोधणार कसं हे मला सुचत नव्हते कारण मला फक्त एवढेच माहीत होते की ती घाटकोपरला राहते पण कुठे ते मला काहीच माहीत नव्हते. आणि तिच्या कोणत्याच मित्राची माझी ओळख नव्हती. त्यामुळे तिला शोधणे माझ्यासाठी खूप कठीण होते. तिचा कधीतरी कॉल येईल या आशेवर मी जगत होतो. पण सहा महिने उलटून गेले तरी तिचा कॉल आला नव्हता.

आता मात्र मी पार खचून गेलो होतो. कदाचित तिच्या घरच्यांनी तीच लग्न लावून दिले असेल आणि मुलगा खूप चांगला असेल म्हणून आता सोनाली माझ्यासोबत बोलत नसेल असे मला वाटू लागले होते. तिच्या विरहामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मला सावरण्यासाठी एक वर्ष तरी गेलं. पण तरीसुद्धा तिची आठवण येत होती पण वाईट पण वाटत होते की ती माझ्या आयुष्यातून अशी निघून गेली. तिने स्वतः जरी मला सांगितले असते तर मीच निघून गेलो असतो तिच्या आयुष्यातून पण तिने असे वागायला नव्हते हवं. मी तिलाच सारखा मनातल्या मनात बोलत होतो.

एक दिवस मी ऑफिसच्या कामानिमित्त घाटकोपरला गेलो असताना मला मागून आवाज आला तू महेंद्र आहेस ना? महेंद्र पाटील. मी मागे वळून पहिले तर एक मुलगी होती पण मी तिला पहिल्यांदा पाहत होतो. पण तरीसुद्धा तिला माझे नाव कसे माहीत हे कळले नव्हते मला. मग तिने सांगायला सुरवात केली. ती सोनालीची मैत्रीण होती आणि तिच्या मोबाईल मध्ये तिने खूपवेळा माझा फोटो पाहिला होता म्हणून तिने मला ओळखले. कितीही काही झाले तरी प्रेम विसरता येत नाही म्हणून मी तिला विचारले सोनाली कशी आहे? सुखी आहे ना तिच्या संसारात? हे ऐकुन ती थक्कच झाली. अरे असे काय विचारतोस? तुला माहित नाही का? दोन वर्षांपूर्वी घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ती या जगात नाही राहिली. त्या मुलीचे हे शब्द ऐकून मी खालीच पडलो. मला माझ्या कानावर विश्र्वासच बसत नव्हता की सोनाली हे जग सोडून गेली आहे. आणि हे मला आता कळतेय.

मी तर तिला खूप बोललो पण आता मला त्याचा त्रास होत होता. का केले देवाने असे? अरे असे झाले तर किमान मला तिला शेवटचे बघण्याचे क्षण पण माझ्या नशिबी नाही आले. खरंच माझा देवावरचा विश्वास तेव्हाच उडाला आहे आणि आजही मी तिची वाट बघत आहे. ती येणार नाही हे माहिती असून सुद्धा मी तिची वाट बघतोय.

मी लिहिलेल्या काही निवडक कथा. कंमेंट करून सांगा कोणती कथा वाचायची आहे.

महेंद्र पाटील (पाटीलजी)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल