भारतीय क्रिकेट संघातील एक तरुण चेहरा म्हणजे ऋषभ पंत. आपल्या धडाकेबाज फलंदाजी ने त्याने अनेक सामने भारतासाठी जिंकवले आहेत. महेंद्र सिंग धोनी नंतर यष्टिरक्षक फलंदाज भारतासाठी कोण असेल? ह्याचा अनेक वर्ष शोध सुरू होता. पंत मुले भारताला एक धोनी मिळाला आहे. असे लोकांचे म्हणणे आहे. धोनीला तो आपल्या गुरुस्थानी मानतो. धोनीकडून त्याने अनेक प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्याचा खेळ अजुन जास्त बहरत चालला आहे ह्यात काही शंका नाही. पण आज आपण पंतच्या खाजगी आयुष्यबद्दल सांगणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला ऋषभच्या खेळाविषयी नाही तर त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. मागील वर्ष म्हणजेच २०१९ मध्ये अनेक खेळाडूंनी लग्न केली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिक पांड्या ने सुद्धा आपल्या लग्नाची गोड बातमी दिली. आज मध्यरात्री पंतने एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत लिहले की मी तुझ्याबरोबर असलो मी मला खूप चांगले वाटत आणि लव इमेज पोस्ट केले. ह्या फोटो मध्ये तो इशा नेगी हिच्यासोबत आहे. गेली अनेक महिने ह्या दोघांच्या प्रेमाची चर्चा झालीच होती. ते दोघं एकमेकांना पाच वर्ष झाली डेट करत आहेत.

इशा ही एक उद्योजिका आहे. तिने सुद्धा आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले पाच वर्ष आपण सोबत आहोत, लव यू. ह्या दोघांच्या पोस्ट मुले दोघेही चर्चेचा विषय ठरले आहेत. जसे पांड्या ने सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देऊन अंगठी घातली तसेच काही ऋषभ कधी करेल ह्याची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत आहेत. मित्रानो तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांबद्दल आम्हाला कमेंट द्वारें कळवा.