हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट मधील एक महत्त्वाचे नाव आहे. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्याने आपले एक वेगळं स्थान भारतीय संघात निर्माण केलं आहे. पण दुखापतीच्या कारणामुळे गेली अनेक महिने पांड्या भारतीय संघाबाहेर आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण ह्या शो मुले हार्दिक पांड्या आणि के एल राहुल टीकेचे कारण बनले होते पण त्याच गोष्टीचा बरेच महिने झाले आहेत. पण आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिक पांड्या ने सर्वांना चकित करून सोडले. त्याने आपल्या सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो पोस्ट केला आहे आणि खाली कॅप्शन मध्ये लिहले आहे की engaged आणि प्रपोज करतानाचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

पांड्यावर महिलांवर विशेष टिप्पणी केल्यामुळे टीका झाली असली तरी त्याचा चाहतावर्ग सुद्धा वेगळा आहे. खास करून अनेक मुलींना तो खूप आवडतो पण आजच्या ह्या फोटोमुले अनेक मुलींचे हृदय तुटले असेल ह्यात काही शंका नाही. हार्दिक ज्या मुलीसोबत लग्न करतोय त्या मुलीचं नाव आहे नताशा स्टांकोविक. ती एक मॉडेल आणि डान्सर आहे आणि अनेक वर्ष बॉलीवुड आणि टीव्हीवर मध्ये काम करत आहे.
स्टार प्लस वरील नच बलिये मध्ये सुद्धा तुम्ही नताशाला नक्कीच पाहिले असेल. हार्दिक आणि नताशा ह्या दोघांनी ही Engage झाल्याचे पोस्ट आपल्या सोशल मीडिया वर शेअर केलं आहे.