Home हेल्थ हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या स्वयंपाक करताना कधीच उकळून नये किंवा अशा प्रकारे शिजवा

हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या स्वयंपाक करताना कधीच उकळून नये किंवा अशा प्रकारे शिजवा

by Patiljee
664 views

आपल्या घरात नेहमीच हिरव्या भाज्या आणि फळभाज्या बनत असतात पण त्या करण्याची एक पद्धत असते. ती काही लोकांना माहीत नसते. भाजी एकदा फोडणीला टाकली ती शिजली म्हणजे झाले आपले जेवण तयार, पण ही भाजी आपण रोज खातो ती कशाप्रकारे शिजली आहे आणि तो शिजताना त्यातील सगळे घटक आपल्या शरीराला मिळाले आहेत का याची कल्पना तुम्ही करत नाहीत.

जेव्हा तुम्ही भाजी फोडणीला घालता आणि लवकर लवकर जेवण होण्याच्या नादात मोठ्या गॅसवर शिजत ठेवता ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे काय होते तर तुमच्या भाजीत असणारे सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि राहिलेला चोथा फक्त आपल्या पोटात जात असतो आणि मग इतके चांगले अन्न खाऊन ही आपल्या शरीराला लागत नाही.

काही लोक काय करतात या भाज्या लवकर शिजण्यासाठी कूकरला लावतात पण हे ही तितकेच चुकीचे आहे कूकर मध्ये ही अन्न शिजवताना आपण गॅस नेहमी मोठा ठेवतो आणि त्यामुळे ही तुमच्या भाजी मधील आवश्यक पोषक घटक नष्ट होतात.

काही लोक अगोदर भाज्या शिजवून घेतात आणि नंतर त्यातील पाणी टाकून देऊन फोडणीला टाकतात हे ही चुकीचे आहे. यासाठी भाजी कच्ची फोडणीला टाकावी आणि एकदम मंद गॅस वर शिजवू द्यावी त्यामुळे त्यातील पोषक घटक अजिबात नष्ट होणार नाहीत. जर भाजी शिजवलेले पाणी तुम्हाला नको असेल तर एक काम करा, व्हेज सूप म्हणून आहारात घेऊ शकता. त्या पाण्यात भरपूर प्रमाणत चांगले घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

भाज्या जेव्हा ताज्या आणल्या जातात तेव्हाच शिजवाव्यात पिवळ्या पडल्यानंतर त्यातील पोषक घटक कमी होतात आणि आपल्या शरीराला ते मिळत नाहीत. भाज्या शिजवताना आवश्यक आहेत तितकेच शिजावाव्यात त्यांचा लगदा होईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत शिजवू नये.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल