मित्रानो राजा हिंदुस्तानी हा चित्रपट त्यावेळी खूप जास्त लोकांच्या पसंतीस उतरला होता. इतका की त्यावेळी जितके चित्रपट रिलीज झाले त्या सगळ्यांना मागे टाकून हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 1996 साली आलेला हा चित्रपट प्रेमी युगुलाकरिता एक पर्वणीच होती. कारण या चित्रपटात ज्या प्रकारे प्रेमाची भाषा दाखवली होती ती लोकांच्या मनात उतरली होती. या चित्रपटात अमीर खान अभिनेता आणि करिश्मा कपूर अभिनेत्रीच्या रोल मध्ये होती. पण या चित्रपटात जास्त महत्त्वाची ठरली ती म्हणजे त्यातील गाणी.
ही गाणी त्यावेळी लोकांच्या काळजावर घाव करीत होती आणि आताही ही गाणी ऐकताना लोक आपल्याला दिसून येतात. ह्या सिनेमातील गाणे तुम्ही कधीही ऐका तुमचे मन शांत होते खास करून जेव्हा तुम्ही प्रेमात किंवा विरहात असता तेव्हा असेच वाटतं की जणू ही गाणी आपल्यासाठीच लिहिले आहेत. ह्याच सिनेमातील असेच एक सुपरहिट गाणे म्हणजे परदेशी परदेशी जाना नाही हे ही खूप लोकांना आवडले होते. या गाण्यामधे अभिनेता अमीर आणि करिश्मा शिवाय आणखीही एक तारका होती तीच नाव कल्पना इयर असे आहे.

हीचा या गाण्यामध्ये एका बंजारिनचा रोल आहे, डफळी वाजवून गाणारी ही अभिनेत्री तेव्हा प्रेक्षकांना खूप आवडली होती. या गाण्या पुरता फक्त तिचा रोल असला तरीही त्यासाठी ती त्यावेळी लोकांच्या जास्त पसंतीस उतरली होती. तिचा गाण्यातील अभिनय पाहता सर्वानाच तीची नजर खिळवून ठेवत होती. त्यावेळी तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. पण आता ही अभिनेत्री खूप बदलली आहे अर्थात वेळेनुसार माणसात बदल हा होणारच पहिल्यापेक्षा ती आता खूप वेगळी दिसत आहे.