व्हायरसचा वाढत जाणारा प्रभाव आणि त्यापासून आपल्या मुलांचा बचाव कसा होईल याकडे आपल्या आई वडिलांचे लक्ष लागले आहे. कारण याचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस कमी व्हावा असे जरी आपल्याला वाटत असले तरी तो दुपटीने आणि तिपटीने वाढत चालला आहे. त्यामुळे शाळा कॉलेज सर्वच बंद आहेत. त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा लहान मुलांच्या शिक्षणावर झाला आहे.
व्हायरसचा प्रादुर्भाव असल्यामुळे मुलांना शाळेत पाठवणे धोक्याचे आहे, ही १०० टक्के खरी गोष्ट आहे. पण घरात बसून मुलांच्या मेंदूवर गंज चढू नये म्हणजेच त्यांचा रोजचा अभ्यासक्रम चालू रहावा यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू केली आहे. पण ही शिक्षण पद्धत पाहता अनेक जणांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महत्वाचे म्हणजे ज्या लोकांना दोन वेळचे अन्न पोटाला मिळत नाही ते आई वडील आपल्या मुलांसाठी मोबाईल कसा आणून देणार? शिवाय जरी मोबाईल असला तरी त्यात ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी रोजचा लागणारा डाटा रिचार्ज करणे त्यांना जमणार आहे, नसेलच जमत.
ठीक आहे इतकं करूनही आपल्या मुलांना मोबाईल वर शिक्षण देणे सहज शक्य आहे किंवा हे आई वडील मुलांना मोबाईल आणि रिचार्ज ही करू शकतात. यांनी कधी विचार केला आहे का की, मोबाईलच्या अती वापरणे यामुळे आपल्या मुलांच्या मानसिक स्थितीवर आणि डोळ्यांवर याच्यावर जो परिणाम होत आहे. तो आपण नाकारू शकत नाही. यासाठी सावधानता म्हणून तुम्ही अँटी ग्लेअर ग्लासचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या मुलांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही पण गरिबांच्या मुलांचे काय?
Image Credit Hendrawan Budi Cahyono
हे पण वाचा
- हॉटेल क्षेत्रात मोठा बदल, मेनू कार्डमध्ये किंमती व्यतिरिक्त ह्याची सुद्धा माहिती असणार
- रक्षाबंधन
- Airtel Offer तुमच्यासाठी, अशा प्रकारे 2GB फ्री डाटा मिळेल
- कडीपत्ता खाण्याचे फायदे