काही दिवसांपासून इंटरनेटवर काही फोटो धुमाकूळ घालत आहेत. लोग आवडीने हे फोटो शेअर करत आहेत. ह्या फोटोतील हा मनुष्य मैदानात आपल्या मित्रांसोबत उभा आहे. अत्यंत मळलेले कपडे परिधान केले आहेत आणि ह्या इसमाला लांब सडक दाढी आहे. तुम्ही जर हा फोटो पाहिला नसेल तर नक्कीच थोडा वेळ तुम्ही ह्या माणसाला ओळखले नसेल. पण तुम्ही हाच फोटो निरखून पाहिलात तर तुम्हाला ह्या दाढी मागचा चेहरा ओळखता येईल. बघा पाहा मग निरखून ओळखतो का तुम्हाला कोण आहे हा?
हा कुणी साधा मनुष्य नाहीतर बॉलीवुड मधील सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान आहे. आमिर नेहमीच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आपल्या कोणत्याही सिनेमासाठी तो संपूर्ण काही पणाला लावतो. म्हणून एका मागोमाग सिनेमे न करता एक किंवा दोन वर्षाच्या काळात आमिरचे सिनेमे येत असतात. तुम्ही जो फोटो सध्या वर पाहात आहात तो फोटो आमिरच्या आगामी सिनेमा लाल सिंह चड्डा ह्या सिनेमातील आहे. ह्याच सिनेमातील हे फोटो कुणीतरी काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आणि हे फोटो खूप वायरल झाले आहेत.

काही नेटकऱ्यांच्या मते हे फोटो जाणीवपूर्वक वायरल केले आहेत. ज्यामुळे आमिरच्या येणाऱ्या सिनेमा लाल सिंह चड्डा ह्याचे आपोहुन प्रमोशन होईल. मित्रानो तुम्हाला काय वाटतं हे फोटो मुद्दामहून शेअर केले आहेत का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट द्वारें कळवा.