Home हेल्थ तुमचीही तेलकट त्वचा आहे? का मग करा हे उपाय

तुमचीही तेलकट त्वचा आहे? का मग करा हे उपाय

by Patiljee
5756 views
Oily face skin

तेलकट त्वचा असणे हा काही तुमचा दोष नाही पण त्या त्वचेची काळजी घेणे हे तुमच्या हातात आहे. तसे बघायला गेलात तर तेलकट त्वचा असणे एक वरदान आहे. कारण या तेलकट त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत पण तरीही तेलकट त्वचा लवकर तेल सोडते आणि मग चेहरा पूर्ण खराब होतो. त्याचप्रमाणे तेलकट त्वचा वेळेवर साफ नाही केली तर त्यावर मुरूम पुटकुळ्या येतात आणि त्यामुळे चेहरा अधिक खराब दिसायला लागतो.

तेलकट त्वचेसाठी उपाय

तेलकट त्वचा स्वच्छ होण्यासाठी दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा पाण्याने धुवून काढावा. याने तेलकट पना कमी होतो.

शिवाय आठवड्यातून तीन वेळा तरी चेहरा स्क्रब करा त्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करा. त्यासाठी बेसन, हळद आणि तांदळाचे पीठ एकत्र करून हे स्क्रब वापरा.

तुमची त्वचा तेलकट आहे त्यासाठी दूध किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थांचा उपयोग चेहऱ्यासाठी करू नका.

मसूर डाळ रात्री भिजत ठेवा ही सकाळी वाटून लावा यामुळे चेर्यावरील तेलकट पना कमी होतो.

गुलाबपाणी याचे थेंब कापसावर घेऊन चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा साफ करा. त्याचप्रमाणे तुम्ही प्रवास करत असाल किंवा जॉब करत असाल तर गुलाब पाणी पर्स मध्ये ठेवा आणि दोन दोन तासाने चेहरा गुलाब पाण्याने साफ करा.

लिंबाचा अर्धा भाग घेऊन तो चेहऱ्यावर चोळावा याने तेलकट पना कमी होईल. पण ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे त्यांची आग होईल अशी लिंबाचा प्रयोग करू नये.

त्याचप्रमाणे मुलतानी माती ही सुद्धा चेहऱ्यावर लावू शकता १५ ते २० मिनिटे लाऊन ठेवा नंतर धुवून काढा.

जरी त्वचा तेलकट असली तरी तिच्यामध्ये ओलवा टिकून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी अलोविरा ज्युस किंवा जेल चेऱ्यावर रोज रात्री झोपताना चोळा.

तेलकट चेहऱ्यासाठी तुम्ही हा RE’ EQUIL Oil Control Anti Acne Face Wash for Oily, Sensitive and Acne Prone Skin फेसवाश खरेदी करू शकता.

चेहरा धुण्या साठी नेहमी ऑईलफ्री आणि नैसर्गिक घटकानि परिपूर्ण असे फेश वॉश वापरा. हे पण वाचा गवती चहा पिण्याचे आहेत वेगवेगळे फायदे पाहूया काय काय आहेत ते

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल