Home हेल्थ सवय करून घ्या रात्री झोपताना चेहऱ्यावर तेल लावायची

सवय करून घ्या रात्री झोपताना चेहऱ्यावर तेल लावायची

by Patiljee
6965 views

मित्र मैत्रिणींनो अशा रोजच्या जीवनातील काही गोष्टी आहेत ज्यांची सवय तुम्हाला व्हायलाच हवी. तशी जबरदस्ती नाही पण खरंच या सवयी आपण आपल्याला लावून घेतल्याने बरेच फायदे आपल्याला मिळत असतात. आता खोबरेल तेलाचे घ्या ना रोज तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या केसात चोलता, नवरा वापरतो तुम्ही ही लावता पण हेच खोबरेल तेल तुमच्या त्वचेसाठी एक उत्तम टॉनिक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हा तुम्ही फक्त थंडीमध्ये ते तुमच्या हात आणि पायांना चोळत असाल पण त्यात असते गुणधर्म लक्षात घ्या आणि आपल्या रोजच्या जीवनात त्यालाही समाविष्ट करून घ्या.

खोबरेल आपल्या सगळ्यांच्याच घरात असनारी ही तेलाची बॉटल पण तुम्ही व्हर्जिन कोकोनट ऑइल तेल वापरल्यास अगदीच उत्तम ठरू शकते. तुम्हाला ते ऑनलाईन मिळेल. 

तुमची त्वचा कोरडी असेल नेहमीच आणि प्रत्येक ऋतु मध्ये ती सुकल्यारखी वाटत असेल तर अशा वेळी रात्री झोपताना हे खोबरेल तेल स्किनवर चोळून झोपावे. तुमची त्वचा टवटवीत होईल.

नारळाच्या तेलात असे काही पौष्टिक घटक असतात जे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यात असणारे फॅटी असिड जे तुमच्या त्वचेला कोरड पडण्यापासून वाचवते. शिवाय लिनोलिक असिड यामुळे ही तुमच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो.

oil on face

जर तुमच्याकडे कोरडी, फिकट त्वचा असेल तर आपल्या नियमित मॉइश्चरायझर ऐवजी नारळ तेल वापरल्याने तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट होऊ शकते, ती जागृत झाल्यावर ताजेतवाने आणि मऊ दिसते.

नारळाच्या तेलाच्या वापरणे तुमच्या शरीरातील कोलेजन उत्पादन वाढते. त्यामुळे काय होते तर हे कोलेजन तुमच्या त्वचेमध्ये लवचिकता ठेवण्यास मदत करते. त्यामुळे सुरकुत्या येण्याचे प्रमाण ही कमी होते.

महत्वाचे म्हणजे तुमचा रंग उजळतो त्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचं थोडा लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण चेर्यावर लावा १५ मिनिटांनी धुवून टाका. यामुळे तुमचा रंग उजळण्यासाठी मदत होईल

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल