Home कथा ऑफिसवाली लवस्टोरी

ऑफिसवाली लवस्टोरी

by Patiljee
1009 views
ऑफिसवाली लवस्टोरी

लेले ह्या दीपा आपल्याकडे आजपासून रूजू झाल्यात तुमच्या हाताखाली, जे काही कामे असतील त्यांना समजावून सांगा असे एच आर लेलेना सांगून गेले. पण लेलेंच्या मनात काही वेगळेच चालू होते. कुठे एवढे काम आहे की अजुन एक कामगार घेऊन आली ही कंपनी, पैसे काय झाडावर उगवतात का? पण नाही सांगणार कोण ना ह्यांना? लेले विचारात मग्न असताना मी त्यांना शेक हेंड करण्यासाठी हात पुढे केला. हॅलो सर मी दीपा पाटील. पण त्यांनी बघूनही न पाहिल्या सारखं केले आणि आपल्या कामात व्यस्त झाले.

लेले बद्दल सांगायचे झाले तर ते ३५ वर्षाचे आहेत. एका अपघातात त्यांची बायको आणि मुलगी गेल्याने त्यांचा स्वभाव असा चिडचिडा झाला आहे. ऑफिस मधील लोक सुद्धा सांगतात की अगोदर लेले खूप छान मनमिळावू होता. नेहमी हसतमुख असणाऱ्या लेलेचे हसू देवाने हिरावून घेतले होते. त्याच्या पत्नी आणि मुलीला जाऊन तीन वर्ष झाली होती पण आजही तो त्यांच्या आठवणीत झुरत होता. म्हणूनच त्याने लग्न केले नव्हते. मुलींसोबत बोलणे त्याने बंदच केले होते. त्यामुळे आपल्या हाताखाली मुलगी काम करणार हे ऐकल्यावर त्याचा राग अनावर होणार ह्याची कल्पना दिपाला आधीच बॉस कडून मिळाली होती.

मी दीपा घरात एकुलती एक, तीसित आली असली तरी अजुन मनासारखा मुलगा कुणी मिळाला नव्हता, म्हणून सिंगल होते. सिंगल मुलगी म्हणण्यापेक्षा एक लग्न न झालेली मुलगी असेल असे समजले तरी काही हरकत नाही कारण माझी मावशी मला नेहमी हेच म्हणते. ऑफिस खूप छान होते. चांगली ऑफर मिळाल्याने मी मागील जॉब सोडून इथे रुजू झाले. पण दिवसामागून दिवस जात होते तरीही लेले काही धडसा माझ्याशी नीट बोलत नव्हता. मी स्वतःहुन बराच प्रयत्न केला बोलण्याचा पण नाहीच. ऑफिसमध्ये सर्व त्याला खडूस म्हणून बोलत होते पण त्याच्यासोबत राहून एक मात्र गोष्ट कळली होती ती म्हणजे तो कितीही वरवर खडूस दिसत असला तरी आतून तो खूप हलवा होता. त्याच्या भूतकाळात तो गुरफटून गेला होता.

बॉसने आम्हाला एका प्रोजेक्ट साठी डेडलाईन दिली होती. त्यामुळे आजच्या आज ते प्रोजेक्ट करून पाठवायचे होते. म्हणून मी आणि लेले दोघेही आज ऑफिस मध्ये उशिरा पर्यंत थांबणार होतो. रात्री ११.३० पर्यंत थांबून आम्ही काम पूर्ण करून घेतले. ऑफिसमध्ये दोघेच असल्याने आजतरी लेले गप्पा मारेल असे वाटले होते पण तसे काही झाले नाही. शेवटी मीच विषय काढला लेले कॉफी घेणार का? त्याच्या नकारात पण होकार होता हे मी जाणले आणि कॉफी घेऊन आले.

बऱ्याच महिन्यांनी त्याच्यासोबत कॉफी घेण्याची ही वेळ होती. मीच विषय काढला लेले सर कोण कोण असते तुमच्या घरी (त्याच्या कुटुंबाबद्दल मला माहित होतं पण विषय सुरू करायचा होता) आई आणि मी असे त्याने हळूच म्हटले. आमचे संभाषण तर बऱ्याच महिन्यांनी सुरू तर झाले होते पण ह्या संभाषणात माझी बाजू वरचढ होती. मी जास्त बोलत होतो आणि लेले कमी. काम संपवून आम्ही घरी जायला निघालो. ऑफिसने आमच्यासाठी कॅब बोलावली होती. आम्ही एकत्रच निघालो.

माझे जास्त बोलणे कदाचित त्याला आवडू लागले होते पण तरीही तो हा ना करत होता. दीपा तुमचे मूल गाव कोणते? मी मूळ रायगड पेझारी गावची आहे. पण तिथून हे ऑफिस खूप लांब आहे म्हणून सध्या मालाड मध्ये मावशीकडे राहते. रायगडचे नाव ऐकुन लेले थोडा भांबावला होता. रायगडची तर माझी सपना पण होती आणि पुढे अजुन काही बोलणार एवढ्यात त्याने स्वतःला सावरले. सपना तुमची पत्नी ना? तुमच्या मुली आणि पत्नी बद्दल माहीत आहे मला. पण लेले कसे आहे आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी जायचं आहे. आणि देवाला पण अशीच माणसे आवडतात जी सर्वांना आवडतात. आणि ते जर तुम्हाला वरून पाहत असतील आणि त्याला असे दिसेल की तुम्ही असे जीवन व्यतीत करत आहात तर त्यांना तरीही आवडेल का? आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल बघा जग सुंदर दिसेल तुलाही.

दिपाचे हे बोलणे जणू लेलेच्या हृदयावर घाव करत होते. घरी पोहोचल्यावर त्याने ह्या गोष्टीचा सखोळीने विचार केला. सारखा दीपाचा चेहरा समोर येत होता. असे का होत होते त्याला कळत नव्हते. दीपामध्ये त्याला सपना दिसत होती. सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने स्वतः दीपाला गुड मॉर्निंग म्हटलं. आज सूर्य कुठून उगवला ह्याचे उत्तर दीपा शोधत होती. नेहमी पेक्षा आज लेलेचा मुड काही वेगळा दिसत होता. तो हसत होता जोक मारत होता. त्याचा हा अवतार तर नवीन होता पण सर्वांना आवडत होता. जणू जुना लेले परत आला होता.

दीपा सोबत जास्त वेळ तो आता घालवू लागला होता. दिपाला त्याचे वागणे वेगळं तर वाटतं होते पण त्या ओघात ती ही त्याच्या अधिक जवळ येऊ लागली होती. दोघात मैत्री पलीकडे नातं निर्माण होऊ लागलं होतं. एकमेकांची सोबत हवीहवीशी वाटत होती. वीकेंड सोबत एन्जॉय होत होते. सर्व अगदी आनंदी चालू होते. दोघांना एकमेकांबददल प्रेम तर होतंच पण व्यक्त करणार कोण? हा प्रश्न मनात होताच.

लेलेला वाटतं होतं की माझे अगोदर लग्न झाले आहे मुलगीही होती मग जर मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगितल्या तर ती का मला स्वीकारेल? तिला माझ्यापेक्षाही अजुन चांगला मिळूच शकतो की. इथे दिपाची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. तिला लेलेवर प्रेम तर खूप होतं पण मी त्याला मनातल्या भावना सांगितल्या तर त्याला असेच वाटेल की मी सहानभूती दाखवत आहे.

दोघांच्याही मनात अनेक विचार येत आहेत म्हणून दोघांनीही अजूनही एकमेकांच्या मनातील गोष्टी सांगितल्या नाही आहेत. दोघेही आज चांगले मित्र आहेत पण त्यापलीकडे मनात विचार असून सुद्धा जाऊ शकत नाही ह्याची दोघांनाही खंत आहे.

मित्रानो तुम्हाला काय वाटतं? आपल्या मनातील भावना अगोदर कुणी व्यक्त कराव्या? आणि का? तुमचे मत नक्की आम्हाला कळवा.

लेखक : पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल