भारतात सध्या काय वातावरण चालू आहे हे तुम्हा आम्हाला माहितीच आहे. ह्या गोष्टीवर लवकरात लवकर आला घालण्यासाठी एका कठोर कायद्याची गरज आहे असे संपूर्ण भारतातून आवाहन होत आहे. ह्याच गोष्टी लवकर घडून याव्या म्हणून स्वाति मालीवाल उपोषणाला बसल्या आहेत. दिल्लीच्या महिला आयोग मधील अध्यक्ष स्वाति मालीवाल या अकरा दिवसांपासून वीणा अन्न पाण्याशिवाय उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पण अजूनही त्या ठिकाणी केंद्र सरकार कडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आहे.
ज्या ठिकाणी अध्यक्ष स्वाति मालीवाल या उपोषणाला बसल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन निर्भया हिच्या आईने त्यांची भेट घेतली. हैदराबाद मधील घटनेसाठी स्वाति मालीवाल त्यावेळी दीक्षा साठी उपोषणाला बसल्या होत्या पण त्यानंतर जेव्हा त्या आरोपींचा पोलिसांनी एनकाउंटर केला त्यानंतर निर्भयाच्या या गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी हे उपोषण करण्यात आले आहे.
निर्भयाची आई आशा देवी यांना स्वाति मालीवाल यांची परिस्थिती पाहवत नव्हती यासाठी त्यांनी एक चिठ्ठी लीहली आणि केंद्र सरकार कडे पाठवली त्यांनी सांगितले की आता तरी सरकार ने योग्य तो निर्णय घ्यावा आणि स्वाति मालीवाल याचा उपोषण तोडण्यात यावे. काय आहे चिठ्ठी मध्ये तुम्ही वाचू शकता.
