निलेश साबळे ह्या व्यक्तीला म्हणजे आता ती सेलिब्रिटी आहे पण जेव्हापासून चला हवा येऊ द्या हा शो सुरू झाला तिथपासून निलेश साबळेला लोक ओळखू लागली आहेत. फक्त ओळखूच नाही लागले तर लोकांना त्याची कॉमेडी ही आवडते. कसे आहात, मजेत ना, हसताय ना? हसायलाच पाहिजे हे वाक्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलून त्याने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. याच शोमध्ये निलेश सोबत कुशल बद्रिके, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे हे कलाकार ही लोकांचे नेहमीच मनोरंजन करत आलेले आहेत. तसेच या शो मध्ये आपल्याला अनेक छोट्या मोठ्या मराठी तसेच बॉलिवूड मधील कलाकाराची हजेरी पाहायला मिळते.
निलेश साबळे यांच्या जीवनाबद्दल थोड्या लोकांनाच माहीत असेल, त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी चला हवा येऊ द्या या शो ने दिली. या शो चे लेखन, सूत्रसंचालन निलेश याने केले आहे पण या शो च्या अगोदर त्याने पहिल्यांदा ज्या शो मध्ये पाऊल ठेवले तो म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार. या शो मध्ये विजय मिळवून त्याने आपल्या विजयाची घोडदौड चालूच ठेवली. त्यानंतर फु बाई फू मधील निलेश ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. शिवाय त्याने नवरा माझा भवरा या चित्रपटामध्ये ही काम केले आहे.
हे सगळे करण्याअगोदर निलेश एक डॉक्टर आहे, तो आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्याने आयुर्वेदिक डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आहे. यात त्याने आयुर्वेदाची एम एसची ही डिग्री घेतली आहे. इतकं करूनही त्याचे या पेशात मन रमेना कारण शाळेत असल्यापासून त्याला अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मध्ये भाग घेतलं आणि हा शो जिंकला ही. निलेश हा एक असा अभिनेता आहे की नाही ज्याच्या वाट्याला आलेले पात्र तो प्रेक्षकांसमोर हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न करतो.
अभिनेता, डॉक्टर, होस्ट आणि दिग्दर्शक ह्या चारही बाजूने निलेश आपला पेशा उत्तम रित्या पेलला आहे. निलेश साबळे याच लग्न झालेले आहे. निलेशचे लग्न झालेले असून त्याच्या पत्नीचे नाव गौरी साबळे आहे. त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे. निलेशच्या स्ट्रगलिंगच्या काळातही ती खंबीरपणे त्याच्यामागे उभी राहिली होती. त्याच्या या आयुष्यात अनेक चढ उतार आले पण त्यातही त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली. दोघांचे लग्न २०१० साली झाले आहे.