Home बातमी ब्रेकिंग न्यूज – NCB चे धाडसत्र सुरूच या बड्या अभिनेत्याच्या घरीही ड्रग्स कनेक्शन प्रकरणी धाड…..!!!

ब्रेकिंग न्यूज – NCB चे धाडसत्र सुरूच या बड्या अभिनेत्याच्या घरीही ड्रग्स कनेक्शन प्रकरणी धाड…..!!!

by Patiljee
527 views

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर मात्र चौकशी मध्ये अनेक मुद्दे बाहेर यायला सुरुवात झाली आहे, मुख्य मुद्दा आत्महत्या आणि त्यावरचा सगळा तपास यावर अलंबलेली होती, तरीही हळूहळू बॉलीवूड मधील नोपोटीसम, ड्रग्स कनेक्शन, यामध्ये वेगवेगळ्या बड्या अभिनेत्यांची नावे पुढे येऊ लागली तशी सगळी बॉलीवूड इंडस्ट्री हादरून गेली, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला आणि रिया चक्रवर्ती ला अटक झाली आणि आधीची मॅनेजर आणि तिची आत्महत्या यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

यातच आता सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल देखील अडकला आहे, NCB (NARCOTICS CONTROL BUARO ) ने अर्जुन रामपालच्या घरावर धाड टाकत ड्रग्स प्रकरणी चौकशी सुरू केली आहे, काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणची मॅनेजर हिला देखील समन्स बजावण्यात आले होते, याआधी फिरोज नाडीयालवाला याच्या पत्नीला समन्स बजावण्यात आले होते, आणि नंतर तिला अटकही झाली होती, तपासादरम्यान नाडीयालवाला यांच्या घरात बेकायदेशीररित्या ड्रग्स सापडले असल्या कारणाने ही कारवाई करण्यात आली होती.

नंतर संपूर्ण पुरावे जमा होत पर्यत तिला अटक होणार नाही असे सांगण्यात आले, मात्र आता या प्रकारामुळे अर्जुन रामपाल देखील अडचणीत सापडला आहे, अर्जुन रामपालचे नाव या ड्रग्स प्रकरणात समोर आल्याने अर्जुन समोरच पेच आणखी वाढला आहे. अर्जुन रामपालची लीव्हिंग पार्टनर म्हणजेच त्याची प्रियसी आणि तिचा भाऊ यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. दिघांचा ड्रग्स रॅकेट मधे सक्रिय सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यादिशेने तपास ही सुरू आहे.

त्याच्या घरवरच नाही तर त्याच्या मालकीच्या अजूनही वेगवेगळ्या जागांवर खार, अंधेरी, बांद्रा इथे चौकशी आणि धाड टाकण्याचे काम चालू आहे.सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन रामपालचा ड्रायव्हर ही यात सामील असून त्याला अटक करण्यात आली आहे, ड्रग्स कनेक्शन मधे अर्जुनच नाव पुढे आल्याने ही कारवाई सुरू करण्यात आलेली समजते. सूर असलेल्या करावाई मध्ये तीन ठिकाणी रेड टाकण्यात येत आहे अंधेरी , खार आणि बांद्रा पाठोपाठ NCB ने अर्जुन रामपाल याची पार्टनर ” ग्याब्रिला डेमोत्रीडेस ‘ हिला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली आहे. ते या टोळीमध्ये सक्रिय असल्याचा संशय आहे.

ओटीटी प्लँटफॉर्म वर अर्जुनचा नेल पॉलिश हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याचा सध्याच्या टिझर ही प्रदर्शित करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती, मात्र आता अर्जुन रामपाल देखील वादाच्या भेवऱ्यात सापडल्याने चौकशीसाठी त्याला बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात धर्मा प्रोडक्शनचे प्रोडक्शन अक्सिक्यूटिव्ह क्षितिज रवी प्रवास याला देखील NCB कडून अटक करण्यात आली होती. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात अनेक धागेदोरे हाती लागले होते यातच दीपिका पदुकोण, रकुलप्रीतनसिंग, सारा आली खान, श्रध्दा कपूर यांसारख्या अभिनेत्रींची नवे समोर आली होती.

याबरोबर आता हळूहळू आणखीही लोकांची नावे समोर येत असल्याने प्रकारणाला नवीन वळणे लागत आहेत. सुशांत सिंग मृत्यप्रकरणी रिया चक्रवर्ती ला अटक झाली होती मात्र आत्महत्या झाल्याचे समोर आल्यावर तिची बेल वर सुटका करण्यात आली. मात्र ड्रग प्रकरणी अनेक लोकांचे हात दगडाखाली सापडल्याने बॉलिवूडकर यावर कुठलेही भाष्य करायला तयार नाही आहेत. सुशांत सिंग ने आत्महत्याच केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यानंतर अनेक बड्या कलाकारांनि एकत्र येत प्रसारमाध्यमांविरुद्ध हाय कोर्टात धाव घेतली होती, यात प्रचंड अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता.

सुशांत सिंग केस दरम्यान अनेक गंभीर आरोप सेलेब्रिटी वर करण्यात आले, त्याचबरोबर अनेक अफवा खऱ्या भासवून अशोभनीय भाषेमध्ये याचे प्रदर्शन करण्यात आल्याने बॉलीवूडकर काहीसे नाराज होते.याच कारणास्तव न्यायालात धाव घेण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा हळूहळू ड्रग्स काँनेक्शनचे धागेदोरे सापडू लागल्याने बॉलीवूड कारणांनी याची धास्ती घेतलेली दिसते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल