अग पण तुझा माझ्यावर सर्वात जास्त विश्वास आहे ना असे नेहमी म्हणतेस तू? मग आता अशी का वागतेस,” का म्हणजे मी.. मी माझ्या कांनानी ऐकले आहे आणि तिने तुमचे फोटो ही सेंड केलेत, तुमच्यासोबत असणारे नको त्या अवस्थेतील शी…! जाऊद्या ना मला तर आता तुमच्याशी बोलायची ही इच्छा नाही, ” पण अग मंदा तू माझं ऐकशील तर …! हे बघ तुला वाटेय तस काहीच नाही ग…आपल्या सुमीची शपथ”, हात नका नका माझ्या पोरीला आणि याच्यापुढे तुमचा माझा काहीच संबंध नसणार इतकं लक्ष्यात ठेवा.
डोळे झाकून विश्वास ठेवला तुमच्यावर आणि असा माझा विश्वासघात केलात. पण याच्यापुढे नाही आणि माझ्या मुलीला घेऊन चालले. याच्यापुढे फोन ही करायचा नाही मला समजलं..एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात सुमी डोळ्यात अश्रू घेऊन मंदा उंबरठा ओलांडनार इतक्यात नरेन ने तिचा हात पकडला म्हणाला नको जाऊस ग…! तुझ्याशिवाय कोणी नाही मला विश्वास ठेव माझ्यावर जे तुझ्यासमोर दाखवले जाते ते सत्य नाही आणि मी ही इतका हतबल आहे की सत्य तुझ्यासमोर सांगायला ही माझ्याकडे पुरावा नाही.
पण आज पाच वर्षाच्या संसारात तुझा माझ्यावर असणारा विश्वास एका फोन ने ढासळला …तुझं तरी काय चुकत म्हणा तुला जे समोर दिसते ते ही तू नाकारू शकत नाहीस…! पण एक लक्षात ठेव मी तुझ्याशी एकरूप आहे शेवटपर्यंत राहीन. दुसऱ्या क्षणी मंदा ने नरेनच्या हातातील हात झटकला आणि ती तरा तरा पाय आपटत निघून गेली. समोर येणाऱ्या रिक्षाला हात केला आणि माहेरची वाट धरली तिच्या घरापासून माहेर केवळ २५ ते ३० मी. होते.
घरी पोचल्यावर समोर व्हरांड्यात खुर्चीवर बाबा पेपर वाचत बसले होते. बाहेरून आवाज दिला ” अग ये पार्वती बाहेर ये मंदा आलीय बघ.. तशी पार्वती बाहेर येऊन सुमीचा पापा घेते आणि तिघी घरात जातात मंदा हातपाय धुऊन व्हरांड्यात बाबासमोर येऊन बसते आणि रडायला लागते. बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात म्हणतात काय झालं मंदा…? जावई बापू आणि तुझं काही बिनसलं का? इतक्यात रडणाऱ्या मंदाला आई गप्प बसवत पाण्याचा ग्लास हातात देते. पाण्याचा एक घोट कसा बसा गळ्यात उतरवते आणि पदराने डोळे पुसत मंदा सगळी हकीकत सांगते.
बाबा दीर्घ श्वास घेतात” पोरी एक सांगू तुझ्या अगोदर पासून मी जावई बापूंना ओळखतो तो माणूस तसा नाही..दोघेही एकाच कंपनीत कामाला होतो त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे मी त्याचं लग्न तुझ्याशी लाऊन दिलं. वर मान करून कुठल्या मुलीकडे बघायचा नाही की आपल्या पेक्षा मोठ्या पण आपल्या खाली कामाला असणाऱ्या वर्कर लोकांचा कधी अपमान केला नाही. आणि अजूनही माझा त्या माणसावर विश्वास आहे यावेळी ती चुकतेस अस मी म्हणणार नाही पण तू जे पाहिलेस ते कदाचित सत्य नसेल ही… पण तू आताच या गोष्टीचा विचार नको करुस काही दिवस राहा इथेच आणि विचार कर या गोष्टीचा.
भाग दुसरा लवकरच पोस्ट करण्यात येईल? तुमच्या मते कथेचा शेवट कसा असेल? काय घडेल पुढे? परत ती नवऱ्याकडे जाईल? की तोच तिला परत न्यायला येईल? की सोडून देईल तो तिला? तुमचे मत आम्हाला कमेंट द्वारें कळवा.
मी लिहिलेल्या या काही निवडक कथा सुद्धा वाचा.
- एक खरीखुरी कथा : प्रवासात भेटलेला गे
- हॉरर स्टोरी : भयाण शांतता
- अपूर्ण प्रेम
- विवाहबाह्य संबंध
- गावाकडचं प्रेम
लेखक : महेंद्र पाटील (पाटीलजी, आवरे उरण रायगड)