दादा संध्याकाळपासून एक गोष्ट तुला सांगायची आहे पण मनात धाक धुक होत आहे, कसे सांगू कळत नाहीये. अग सोनू काय झालं? ये इकडे बस शांत आणि सांग काय झालं आहे ते? अरे दादा मी आज वहिनीला ऑफिसमधून येताना कुणाच्या तरी बाईकवर येताना पाहिले. मला आधी वाटले वहिनी नसतील पण पुढे आमची बस गेली तेव्हा चेहरा दिसला. पाहून खूप वाईट वाटले रे. आपल्या वहिनीचे काय चक्कर असेल बाहेर असे मला वाटतं आहे.
सोनू हीच गोष्ट मी तुला बोललो तर आवडेल का ग तुला? तू कॉलेजमधून घरी येताना कित्येकदा दोन चार मुलांच्या बाईक्सवरून घरी येते. मग ते सर्व तुझे प्रियकर आहेत का? तुझेही बाहेर असेच चक्कर चालू आहे का मग? दादा तू हे असे काय बोलतोस. तुला माहित आहे ना माझे मित्र आहेत ते सर्व, तू तर ओळखतोस त्या सर्वांना? हे बघ आता कसे मुद्द्याचे बोललीस. जसे मी तुझ्या मित्रांना ओळखतो तसे तिच्याही मित्रांना ओळखतो.
तुझी वहिनी आज तिच्या घरी जाऊन मग आपल्या घरी येणार आहे आणि ज्या मुला सोबत तू तिला बाईकवर पाहिलेस ना त्या मुलाचे घर तिच्या घराजवळ आहे. त्याच नाव राहुल आहे आणि मी त्याला चांगलाच ओळखतो. ऑफिस सुटल्यावर ती त्याच्यासोबत घरी जाणार आहे हे तिने मला आधीच सांगितले होते. कसे आहे ना सोनु, अजुन वयोमानाने तू लहान आहेस, जसजशी मोठी होशील तसे तुला कळेल हे जग काय आहे. पण माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जसं तुझा स्वतःवर विश्वास आहे ना अगदी तोच विश्वास तुझ्या होणाऱ्या जोडीदारावर ठेव. कारण आजकाल विश्वासामुळे अनेक नाती तुटताना.
एकदा आपल्या जोडीदाराला समजून तर घ्या. त्याचेही स्वतः चे असे आयुष्य आहे, स्वातंत्र्य आहे. नात्यात दोगाघांही जसे आपण समजून घेतो तसेच दोघानाही एकमेकांसाठी स्पेस दिली पाहिजे. तुझ्या वहिनी आणि माझ्या नात्यात तेच तर एक घट्ट नातं आहे. जे असे कुणीही काही सांगितले तर तुटणार नाहीये. कारण आमचा एकमेकांवर तेवढा विश्वास आहे. चल जा आता किचन मध्ये तुला आई मघापासून आवाज देतेय बघ.
सॉरी दादा आज खरंच तू मला खूप मोठी शिकवण दिलीस. आयुष्यात मी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवेन.
लेखक : पाटीलजी