नसिरुद्दीन शाह हे बॉलीवूड सिनेमातील खूप मोठं नाव आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी प्रत्येक सिनेमात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे आजवरचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील असा कोणताच सिनेमा नसेल जो पाहून तुम्हाला कंटाळा येईल. हीच तर खास गोष्ट असते एका चांगल्या अभिनेत्याची. आज आम्ही तुम्हाला नसरुद्दीन शाह ह्यांच्या बद्दल अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला आजवर माहितीही नसतील.
त्यांचा जन्म २० जुलै १९५० मध्ये झाला आहे. आता त्यांचं वय ७९ च्या घरात आहे तरीही अजूनही ते फिट आहेत. आपले सर्व शिक्षण त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये पूर्ण केले पण नोकरी मध्ये मन न लागल्यामुळे त्यांनी अभिनयात आपले करीयर बनवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ते उत्तर प्रदेश वरून मुंबई मध्ये दाखल झाले. अनेक बॉलीवूड सिनेमात त्यांनी काम करण्यासाठी ऑडिशन दिल्या पण नेहमीच हाती निराशा आली पण जेव्हा त्यांना पहिली फिल्म हम पांच मिळाली तेव्हापासून त्यांनी परत मागे वळून पाहिले नाही.
नसिरुद्दीन शाह ह्यांनी आपले बालपणीचे प्रेम परवीन मुराद यांच्यासोबत १९६९ मध्ये लग्न केलं. त्यांनी पत्नी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठी असूनही त्यांनी लग्न केलं होत. जेव्हा त्यांचं लग्न झाले तेव्हा ते २० वर्षाचे तर परवीन ३५ वर्षाच्या होत्या. काही वर्षात त्यांना एक मुलगा सुद्धा झाला. पण सततच्या भांडणामुळे त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते दोघं घटस्फोट घेऊन विभक्त झाले.
घटस्फोट झाल्यानंतर काही महिन्यांनी जेव्हा नसिरुद्दीन ह्यांनी दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांची पहिली बायको परत त्यांच्या घरी आली आणि जबरदस्ती घरात राहू लागली. बऱ्याच दिवसानंतर त्यांना समजण्यात आले. तुमच्या माहिती साठी नसिरुद्दीन ह्यांनी १९८२ मध्ये रत्ना पाठक यांच्यासोबत दुसरा विवाह केला. रत्ना पाठक ह्यांना तुम्ही गोलमाल, खुबसुरत ह्या सिनेमा मध्ये काम करताना पाहिले आहे. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं आहे आहेत एक विवान शाह आणि इमाद शाह. विवानला तुम्ही २०१५ मध्ये प्रदर्शित झालेली मल्टी स्टार फिल्म हॅपी न्यू इअर मध्ये पहिलेच असेल.
आता पर्यंत त्यांना नॅशनल अवॉर्ड, पद्मभूषण, पद्मश्री हे मौलाचे समजले जाणारे अवॉर्ड मिळाले आहेत.