महाराष्ट्राची हास्य क्वीन म्हणून तिची ओळख आहे अशी नम्रता संभेराव आवटे. आपल्या कॉमेडीच्या अचूक वेळेने तिने भल्या भल्याना पोट धरून हसायला भाग पाडले. महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये प्रसाद खांडेकर सोबत तिने अनेक रंजक स्किट सादर करून लोकांना खळखळून हसायला लावले आहे. नम्रताने आपल्या आयुष्यात अनेक नाटके, सिनेमे आणि रिऍलिटी शो केले आहेत.
नम्रताचां जन्म २९ ऑगस्ट १९८९ मध्ये झाला आहे. तिने बाबू बजा बाजा (नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म), लुझ कंट्रोल, व्हेंटिलेटर, किरण कुलकर्णी Vs किरण कुलकर्णी आणि नाच तुझाच लगीन हाय ह्या सिनेमात कामे केली आहेत. महाराष्ट्रचा सुपरस्टार ह्या रिऍलिटी शो मध्ये ती प्रथम आपल्याला दिसली होती. त्यानंतर तिने झी मराठीवर लज्जा, कळत नकळत, ईटीवी वरील ह्या गोजिरवाण्या घरात, स्टार प्रवाह वरील पुढचं पाऊल आणि झी युवा वरील बाप माणूस ह्या मालिकेत कामे केली आहेत.

नम्रताच्या नवऱ्याने नाव योगेश संभेराव आहे आणि त्यांना एक गोंडस मुलगा सुद्धा आहे. त्याचे नाव रुद्राज आहे. सध्या नम्रता रंगभूमीवर प्लेंचेट ह्या विनोदी नाटकात काम करत आहे. ह्यात तिच्यासोबत मयुरेश पेम, मनामित पेम, महेश जाधव आणि रौनक शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हे नाटक सध्या तुफान गाजत आहे. यंदाच्या झी नाट्य गौरव मध्ये ह्याच नाटकासाठी नम्रताला विनोदी अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले आहे.
आपल्यापैकी अनेकांना नम्रता आणि तिची हास्याची मेजवानी नक्कीच आवडत असणार ह्यात काही शंका नाही. आजवर तिने केलेल्या अनेक भुमिकांपैकी कोणती भूमिका जास्त आवडली हे आम्हाला नक्की कळवा.